शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे द्विशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात २१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाला होता़ या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात २१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाला होता़ या अहवालामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २१६ एवढी झाली आहे़ एकाच रात्रीत कोरोनाने २०० रुग्णांचा टप्पा पार केल्याने रुग्ण संख्येचा वाढता वेग चिंतेची बाब ठरत आहे़ दरम्यान नंदुरबार शहरातील बागवान गल्लीतील एकाचा मृत्यू झाला आहे़मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातील ३, मोहिदा ता़ शहादा आणि जनता पार्क नवापूर तर नंदुरबार शहरातील बागवान गल्ली, गांधीनगर,चौधरी गल्ली, नागाई नगर, लहान शहादे ता़ नंदुरबार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, भाट गल्ली, आर्शिवाद कॉलनी, धर्मराज नगर, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय, ज्ञानदीप सोसायटी, हुडको कॉलनी येथे प्रत्येकी एक तर देसाईपुरा व सहारा टाऊन येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत़ रात्री उशिरा हे रुग्ण आढळून आल्यानंतर त्याठिकाणी संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती़दरम्यान नंदुरबार शहर आणि तालुक्यात रुग्णांची संख्या आता १४१ झाली आहे़ त्याखालोखाल शहादा येथे ३८ रुग्णांची नोंद झाली आहे़ एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मृत्यूच्या नोंदीी झाल्या आहेत़ जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे़ मंगळवारी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या बागवान गल्लीतील ४५ वर्षीय पुरुषाला २ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्याचा चार जुलै रोजी मृत्यू झाला होता़ मंगळवारी रात्री उशिरा त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़शहरातील १६ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १० जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे़ यात सहारा टाऊन येथील चार, गांधीनगर येथील ५ तर बागवान गल्लीतील मयताच्या पत्नीला क्वारंटाईन केले आहे़ बागवान गल्लीतील मयत पुरुष हा बाहेरगावी गेला होता किंवा कसे, याची माहिती आरोग्य विभाग घेत आहे़ इतर १५ ठिकाणच्या बाधितांचा पुणे, धुळे, शहादा यासह इतर ठिकाणी प्रवास झाल्याची माहिती आरोग्य विभागाला संबधितांनी दिली आहे़ त्यानुसार त्यांच्या संपर्कातील लक्षणे दिसून आलेल्यांना क्वारंटाईन केले गेले असून उर्वरित ५० च्या जवळपास नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ प्रशासनाने लहान शहादे येथील ५ जणांना क्वारंटाईन करुन याठिकाणी निर्जंतुकीकरण व फवारणी पूर्ण केली आहे़

जिल्ह्यात आढळलेल्या बहुतांश रुग्णांनी बाहेरगावी प्रवास करुन परत आल्यावर संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ प्रवास करणे गैर नसले तरी प्रवासादरम्यान आणि ज्याठिकाणी गेले आहोत त्याठिकाणी उपाययोजना न करता, नकळतपणे बाधितांच्या संपर्कात आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे़ सोशल डिस्टन्सिंग, सॅनेटायझेशन, मास्क व हॅँडग्लोव्हजचा वापर न करणे आदी कारणांमुळेही हा फैलाव झाला असावा असे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़

 

२४ जूननंतर वाढला रुग्णांचा वेगजिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित एप्रिल महिन्यात आढळून आला होता़ त्यानंतर १३ जूनपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा ५० झाला होता़ २४ जून रोजी १०० तर ६ जुलै पर्यंत आकडा २०० च्या पुढे गेला आहे़जिल्ह्यात २४ जून ते ६ जुलै हा कालावधी सर्वाधिक घातक ठरला आहे़ सर्वाधिक १४१ रुग्ण संख्या ही नंदुरबार शहर व तालुक्यातील आहे़ यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे़ तर १०२ बरे झाले झाले आहेत़शहादा येथे आजअखेरीस ३८ रुग्णांची नोंद आहे़ यातील १६ जण बरे झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे़जिल्ह्यात २७ जून ते ६ जुलै या ११ दिवसांच्या काळात सर्वाधिक ५३ रुग्णांची नोंद झाली आहे़तब्बल दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या तळोदा तालुका आणि शहरात १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे़ यातील १४ जण बरे झाले आहेत़ त्याखालोखाल अक्कलकुवा १५ तर नवापूर ३ आणि धडगाव तालुक्यात मंगळवारी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़