शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची संपर्क साखळी तोडणारच :जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे आणि ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजाराच्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. दरम्यान आणखी एक नवीन कोवीड कक्ष सुरू होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी. बोडके आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले, नगरपरिषदेने ध्वनीक्षेपकाद्वारे प्रतिबंधक क्षेत्रातील नागरिकांना घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती द्यावी. संपर्क साखळी पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात यावा आणि आजाराची लक्षणे असणाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात यावे. एखाद्या कोरोना संसर्ग नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये याबाबत प्रबोधन करण्यात यावे. तसेच अंत्ययात्रेस किंवा त्याच्या घरी २० पेक्षा अधिक नागरिक राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.एकलव्य इंग्लिश मिडियम स्कूल येथे नवे कोवीड केअर सेंटर दोन दिवसात तयार करावे. त्यासाठी अधिक मनुष्यबळ लावण्यात यावे. त्याठिकाणी विविध सुविधा, औषधे व आवश्यक साधनसामग्रीची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था त्याच परिसरात करण्यात येऊन त्यांना भोजन व इतर सुविधा उत्तम दर्जाच्या द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाºयांना घ्यावयाच्या खबरदारीबाबत सूचना देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. नंदुरबार शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात १८ सर्वेक्षण टीम कार्यरत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.