कोरोना चाचण्या वेटींगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:26 IST2020-08-02T12:25:59+5:302020-08-02T12:26:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रॅपीड अँटीजन टेस्टची स्थानिक ठिकाणी सोय करून देखील जिल्ह्यात कोरोना स्वॅब अहवालांची वेटींग वाढतच ...

Corona is waiting for the tests | कोरोना चाचण्या वेटींगला

कोरोना चाचण्या वेटींगला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रॅपीड अँटीजन टेस्टची स्थानिक ठिकाणी सोय करून देखील जिल्ह्यात कोरोना स्वॅब अहवालांची वेटींग वाढतच चालली आहे. शनिवारी सकाळपर्यंत तब्बल ४९० अहवाल प्रलंबीत होते. शनिवारी सायंकाळपर्यंत वेटींग ५२८ पर्यंत आली होती. एवढ्या मोठ्या संख्येने अहवाल प्रलंबीत राहत असल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढत चालला आहे.
अहवाल येत नसल्याने अनेक संशयीत खुलेपणाने बाहेर फिरत असल्यामुळे त्यांच्यापासून इतरांना धोका वाढत आहे. त्यामुळे नंदुरबारात नियोजित असलेली अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळा तातडीने सुरू करावी अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वॅब संकलन देखील वाढविण्यात आले आहे. परंतु चाचणी अहवालच लवकरच येत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी सकाळी जवळपास ४९० वेटींग होती. ती दुपारपर्यंत ५२८ वर आली होती. सायंकाळी उशीरापर्यंत काही अहवाल येण्याची शक्यता होती.
स्वॅब वाढले, चाचण्या कमी
जिल्ह्यात विशेषत: नंदुरबार व शहादा येथे स्वॅब संकलन वाढले आहे. त्यासाठी विविध ठिकाणी सोय करण्यात आली आहे. नंदुरबारात दोन फिरते पथक कार्यान्वीत करून ते स्वॅब संकलन करीत आहेत. याशिवाय नंदुरबार जिल्हा रुग्णालय आणि शहादा येथील कोविड कक्षात देखील स्वॅब संकलन केंद्र सुरू आहे. येत्या काळात नंदुरबारात आणखी दोन ठिकाणी आणि तळोदा व नवापूर येथे स्वॅब संकलनाची सोय करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
स्वॅब संकलन वाढले असले तरी चाचण्या मात्र वेळेवर होत नसल्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला आहे.
वेगवेगळया ठिकाणी उपचार
आजाराची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय व सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोविड केअर सेंटर येथे व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १४ वैद्यकीय अधिकारी, ३३ परिचारिका, २ इतर अधिकारी आणि २० इतर कर्मचारी रुग्णांना २४ तास सेवा देत आहेत. काही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संसर्ग होवूनही रुग्णसेवेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. बरे होणाºया रुग्णांनी उत्स्फुर्तपणे संकटाच्या परिस्थितीत सेवा देणाºया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबद्दल आदराची भावना व्यक्त केली आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे रुग्णालयात सर्व प्रकारची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या आहारावरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्यादृष्टीने त्यांना उपचार व आहार देण्यात येत आहे. त्यामुळे बरे होणाºयांची संख्या सातत्याने वाढते आहे. रक्तदाब, मधुमेह आदी आजार असणारे आणि वृद्ध रुग्णदेखील वेळीच तपासणी झाल्याने बरे झाले आहेत.

१३५ आॅक्सीजन बेड : जिल्हा शासकीय रुग्णालयात ३८ व्हेंटीलेटर्स व ३० आॅक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. येत्या आठवड्यात त्यात आणखी १३५ आॅक्सिजन बेड्सची भर पडणार आहे. शिवाय कोरोनावर उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी शासन स्तरावरदेखील प्रयत्न करीत आहेत. वेळेवर आजाराचे निदान झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढू शकेल. त्यामुळे शहरी भागात मोबाईल स्वॅब टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
नागरिकांनी ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. आजार उपचारानंतर बरा होत असल्याने न घाबरता तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

 

Web Title: Corona is waiting for the tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.