Corona Vaccination: लसीकरणासाठी वासुदेव, सोंगाड्या पार्टी; नंदुरबारमध्ये मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 08:40 IST2021-06-03T08:40:09+5:302021-06-03T08:40:49+5:30

आदिवासी भागात लसीकरणाला वेग

Corona Vaccination: Vasudev, Songadya Party for Vaccination | Corona Vaccination: लसीकरणासाठी वासुदेव, सोंगाड्या पार्टी; नंदुरबारमध्ये मोहीम

Corona Vaccination: लसीकरणासाठी वासुदेव, सोंगाड्या पार्टी; नंदुरबारमध्ये मोहीम

- रमाकांत पाटील

नंदुरबार : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही लसीकरणासाठी निरूत्साही असलेल्या आदिवासी भागात उत्साह भरण्यासाठी विविध जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत. विशेषत: आदिवासी भागातील लोकप्रिय असलेल्या सोंगाड्या पार्ट्यांनी ग्रामीण भागात चांगलाच रंग भरला आहे. त्याला वासुदेव, भाेलेनाथाचे सोंग घेऊन होणारी जनजागृती आणि जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांच्या बोलीभाषेतील ध्वनीफितींनीही भर घातली आहे. त्यामुळे आदिवासी भागात लसीकरणाला वेग आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात स्वत: भेट देऊन आदिवासींशी संवाद साधला आणि ‘आपण स्वत: लस घेतली आहे, आपणही घ्या’ असे आवाहन केले. मात्र, साक्षरतेचे कमी प्रमाण, त्यातच अफवा व  अंधश्रद्धेचाही प्रभाव असल्याने लसीकरणासाठी लोक धजावत नव्हते. त्यावर पर्याय म्हणून जिल्हा प्रशासनाने बोली भाषेत लोकजागृतीचा उपक्रम सुरू केला. डाॅ. भारूड यांना आदिवासी व अहिराणी भाषा बोलता येतात. त्यांनी बोली भाषेतील ध्वनीफिती प्रसारित केल्या. 

आतापर्यंत १५ गावांत कार्यक्रम केले असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपण कार्यक्रम केलेल्या गावांमध्ये लसीकरण शिबिरालाही लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. 
- राजू गावित,  कळवण, नंदुरबार

Web Title: Corona Vaccination: Vasudev, Songadya Party for Vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.