कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST2021-06-28T04:21:30+5:302021-06-28T04:21:30+5:30
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी घोषित होणारे लाॅकडाऊन नागरिकांना मानसिकदृष्ट्याही त्रास होत आहे. दीड वर्षात वेळोवेळी घरातच राहिल्याने ...

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप !
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी घोषित होणारे लाॅकडाऊन नागरिकांना मानसिकदृष्ट्याही त्रास होत आहे. दीड वर्षात वेळोवेळी घरातच राहिल्याने मोबाईचा वापर वाढला आहे. परंतु, या मोबाईलमुळे अनेकांची झोप उडाली असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्ह्यातील ३५ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झाले आहेत. परंतु, यानंतरही कोरोनाची भीती कायम आहे. भीतीमुळे काहींना निद्रानाश सतावतो आहे. घरातच अडकून पडल्यामुळे मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल आपलासा झाला आहे. परंतु, या काळात मोबाईलचा अतीवापर झाल्याने त्याचे दुष्परिणाम आता समोर येत आहेत. कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद पडले आहेत. मोबाईलवरचा ओटीटी प्लॅटफाॅर्म अधिक जवळचा वाटू लागला आहे. यातून दिवस-रात्र ओटीटीवरील चित्रपट, वेबसिरीज यांना पसंती दिली जात आहे. सोबतच सोशल मीडिया आहेच. सतत मोबाईलला खिळून राहिल्यामुळे झोप कमी होऊन आरोग्यावर परिणाम झाल्याची लक्षणे १६ ते ४५ पर्यंतच्या वयोगटात अधिक प्रकर्षाने दिसून येत आहेत.
झोप का उडते
मोबाईल किंवा टीव्ही तासनतास बघितल्याने नागरिकांमध्ये नैराश्य वाढून, ताण-तणावामुळेही झोप उडते.
मनात नकारात्मक विचारांचा साठा झाल्यास झोप कमी होते. कोरोनाच्या भीतीमुळे झोप गेल्याचे समोर आले आहे.
रात्री उशिरापर्यंत मोबाईल सर्फिंग करीत गेम खेळणाऱ्यांना निद्रानाशदेखील जडू शकतो. झोपेअभावी त्यांच्यात ताणतणाव वाढतात.
कमी झोपेचे दुष्परिणाम
झोप कमी झाल्याने दिनचर्या बिघडते.
झोप कमी झाल्यास चिडचिड वाढते.
झोप कमी झाल्याने ॲसिडिटी वाढते.
मानसिक व शारीरिक थकवा जाणवतो.
नागरिकांनी कुटुंबासोबत वेळ घालविला पाहिजे. कुटुंबाला वेळ देण्याची हीच संधी आहे. रात्री वेळेवर झोपून सकाळी उठून व्यायाम करण्यावर भर दिल्यास मानसिकदृष्ट्या सक्षम राहता येते.
- डॉ. राजेश वळवी, नंदुरबार.
झोप लागत नसेल तर परस्पर गोळी घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळी घ्यावी. नैसर्गिक झोप येण्यासाठी प्रयत्न करावे.
झोपेची गोळी घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक करण्यात आले आहे. औषध विक्रेत्यांनी त्याचे पालन करावे.
झोपण्यापूर्वी आवडीचे संगीत ऐकावे.
नैसर्गिक झोपेसाठी प्रयत्न करावे.
रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा.
रात्री जास्त वेळ मोबाईल बघू नये.
झोपेची गोळी घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक करण्यात आले आहे. औषध विक्रेत्यांनी त्याचे पालन करावे.
कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. कोरोना हा बरा होणारा आजार आहे. अनेकांच्या मनात भीतीने घर केले आहे. आप्त, कुटुंबीय व स्वकीयांच्या मृत्यूमुळे अनेकजण खचले आहेत. नकारात्मक विचार सोडून दिल्यास अडचणी दूर होतात.
- डॉ. राजेश मेश्राम, मानसोपचार तज्ञ.