कोरोनामुळे जिल्ह्यातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:20+5:302021-02-11T04:33:20+5:30

जिल्ह्यात दरवर्षी ५०० पेक्षा अधिक शिबिरांचे आयोजन करून राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन शस्रक्रिया करण्यात येतात. जिल्ह्यातील ...

Corona reduced the percentage of family planning surgeries in the district | कोरोनामुळे जिल्ह्यातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचा टक्का घसरला

कोरोनामुळे जिल्ह्यातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचा टक्का घसरला

जिल्ह्यात दरवर्षी ५०० पेक्षा अधिक शिबिरांचे आयोजन करून राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन शस्रक्रिया करण्यात येतात. जिल्ह्यातील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हा उपक्रम वर्षभर राबवण्यात येतो. गेल्या काही वर्षात या शस्त्रक्रियांचा टक्का वाढत होता. २०१९ या वर्षात १० हजारांपेक्षा अधिक महिला तर दीड हजाराच्या जवळपास पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याची माहिती आहे. परंतु २०२० या वर्षात कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च ते ऑक्टोबर या काळात सर्वच शिबिरे बंद ठेवण्यात आल्याने एकही शस्त्रक्रिया होऊ शकलेली नाही. तब्बल आठ महिने बंद असलेले शस्त्रक्रियांचे कामकाज ऑक्टोबर महिन्यात सुरु करण्यात आले असले तरी अद्याप त्याला हवे तेवढे यश मात्र मिळालेले नाही. २०२१ या वर्षात मागील वर्षाचे उद्दिष्ट ठेवत आरोग्य विभागाकडून कामकाज करण्यात येत आहे. येत्या वर्षात यानुसार कामकाज होणार आहे.

Web Title: Corona reduced the percentage of family planning surgeries in the district