जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटले, परंतु ऑक्सिजन सिलिंडर संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:29 IST2020-11-05T11:29:16+5:302020-11-05T11:29:35+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना रुग्ण संख्या घटल्याने ऑक्सीजनचीही मागणी घटली आहे. दररोज किमान १२० ते १४० ...

जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटले, परंतु ऑक्सिजन सिलिंडर संख्या वाढली
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना रुग्ण संख्या घटल्याने ऑक्सीजनचीही मागणी घटली आहे. दररोज किमान १२० ते १४० जम्बो सिलिंडर लागत होते तेथे आता केवळ ७० सिलींडर लागत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय तीन तर खाजगी चार कोरोना उपचार सेंटर बंद झाले आहेत. सणासुदीच्या काळातच कोरोना रुग्णसंख्या घटल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने उपाययोजना कायम ठेवल्या आहेत. शिवाय ऐनवेळी कोरोना सेंटर सुरू करण्याची वेळ आली तर त्यासाठीही सज्जता ठेवण्यात आली आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोरोना उपचार कक्षांमध्ये देखील रुग्ण कमी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे ऑक्सीजन सिलेंडरची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढली आहे.
फक्त कोविड रुग्णांसाठी एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात तब्बल ७,२३७ जम्बो ऑक्सीजन सिलिंडर लागले आहेत. सुरुवातीच्या काळात जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात ऑक्सीजन बेडची संख्या कमी होती. त्यामुळे सिलिंडरही कमी लागत होते.
जुलै महिन्यापासून ऑक्सीजन बेडची संख्या वाढल्याने सिलिंडरही जास्त लागत आहेत. त्यामुळे जुलै ते आऑक्टोबर या चार महिन्यात दररोज हजार पेक्षा अधीक सिलिंडर लागत आहेत. ऑक्टोबर महिन्यात तर तब्बल तीन हजारापेक्षा अधीक सिलिंडर लागले आहेत.
दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आवश्यक तेवढ्या ऑक्सीजन सिलिंडरचे नियोजन करण्यात येत आहे. लवकरच नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लान्ट कार्यान्वीत होत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात आवश्यक तेवढे ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले असल्याची माहिती निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.के.डी.सातपुते यांनी दिली.
स्वॅब संकलन झाले कमी
गेल्या महिन्याभरापासून स्वॅब संकलन कमी झाले आहे. त्यामुळे चाचण्याही कमी झाल्या आहेत. त्याचा परिणाम रूग्णसंख्येवर दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जणांची कोविड टेस्ट पाॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसात १०० पेक्षा कमी जण पाॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुसरी लाट येते किंवा नाही, आली तर किती रुग्ण आढळतील याकडे लक्ष लागून आहे.