तळोद्यातील बैल बाजाराला कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:10 IST2020-05-31T12:10:05+5:302020-05-31T12:10:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन बाजार समित्यांना पशुधन खरेदी-विक्रीसाठी परवानगी दिली ...

तळोद्यातील बैल बाजाराला कोरोनाचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन बाजार समित्यांना पशुधन खरेदी-विक्रीसाठी परवानगी दिली असली तरी तळोदा येथील शुक्रवारच्या बैलबाजारात एकही बैल विक्रीसाठी आला नव्हता. काही शेतकरी तपास करून निघून गेले होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बाहेरील व्यापाऱ्यांच्या गाड्या अडविल्या जावून नाहक त्रास दिला जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच बैल बाजारालाही फटका बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी प्रशासनानेच ठोस भूमिका घेण्याची शेतकºयांची मागणी आहे.
कोरोना या वैश्विक महामारीचा सातत्याने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्वच प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी गेल्या मार्च महिन्यांपासून बाजार समित्यांमधील बैलबाजारदेखील बंद करण्यात आला होता. तथापि शेतकºयांच्या खरीप हंगामाला येत्या जून महिन्यांपासून सुरूवात होत आहे. साहजिकच त्यांना मशागतीच्या कामांना बैलजोडीची आवश्यकता भासण्याची शक्यता लक्षात घेऊन पणन महासंघाने बाजार समित्यांमधील भरणाºया बैल बाजाराच्या खरेदी-विक्रीस नियमांचे पालन करून शिथिलता द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली होती. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनानेदेखील पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील बाजार समित्यांना शासनाच्या नियमांचे पालन करून बैलबाजार भरण्याची परवानगी एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.
तळोदा बाजार समितीच्या प्रशासनानेदेखील प्रशासनाची परवानगी मिळाल्याबरोबर शुक्रवारच्या बैलबाजारासाठी आपल्या पटांगणावर सोशल डिस्टन्सिंगची आखणी करून सुसज्ज अशी तयारी केली होती. तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर बैल बाजार भरणार असल्यामुळे बैलांचीही चांगली आवक होईल, अशी आशा बाजार समितीच्या प्रशासनाबरोबरच शेतकºयांना होती. परंतु त्या दिवशी एकही बैल विक्रीसाठी आला नाही. बाजार समितीची निराशा झाली. प्रशासनाने जिल्हाबाहेरील अनेक व्यापाºयांना भ्रमणध्वनीने संपर्क केला होता. मात्र बैल बाजारात विक्रीसाठी ज्या वाहनातून बैल आणतो तेव्हा रस्त्यात पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात असतो. त्यामुळेच बाजारात बैले विक्रीसाठी आणू शकलो नाही, अशी निराशाजनक प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली.
तळोदा बाजार समितीतील आठवडे बैल बाजारात बाहेर जिल्ह्यातील व्यापारीच अधिक आपले पशुधन आणत असतो. वास्तविक जिल्ह्यातील स्थानिक हातदोरवाले व्यापाºयांनीही बैल आणले नाहीत. कोरोनाची भिती अजूनही या व्यावसायिकांमधून गेलेली नाही. याबाबत बाजार समितीने त्यांच्यामध्ये जनजागृती केली पाहिजे. शेतकºयांच्या खरीप हंगामाला सुरूवात होण्यास काही दिवसांचाअवधी आहे. त्याचातच बैल बाजारात बैलांची आवक येत नसल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण शुक्रवारच्या बाजारात बैलच न आल्यामुळे शेतकºयांना निराश होऊन परत जावे लागले. या जिल्हा प्रशासनाने व्यावसायिकांच्या बैल वाहतुकीसाठी संबंधीतांशी चर्चा करून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी शेतकºयांची मागणी आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा बैल बाजार बंद होता. प्रशासनाने पुन्हा बाजार सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. शुक्रवारच्या बैल बाजारासाठी आम्ही शासनाच्या नियमांच्या पालनानुसार सुसज्ज तयारी केली होती. मात्र एकही बैल विक्रीसाठी आला नाही. व्यावसायिकांशी संपर्कदेखील केला होता. तरीही पुढील बाजारासाठी अधिक बैलांची आवक येण्याकरीता प्रयत्न करणार आहोत.
-सुभाष मराठे,
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, तळोदा