शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अक्कलकुव्यात शासकीय कार्यालयाचे दरवाजे ‘सामान्यांना बंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कोरोनाच्या धास्तीमुळे अधिकाऱ्यांनी कामानिमित्त येणाºया सामान्य नागरिकांसाठी दरवाजे बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कोरोनाच्या धास्तीमुळे अधिकाऱ्यांनी कामानिमित्त येणाºया सामान्य नागरिकांसाठी दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़ दरवाजांऐवजी प्रशासनाने सुरु केलेली एकखिडकी योजना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरत असली तरी अडगळीत असलेल्या खिडकीला लोंबकणारे नागरिक मात्र यामुळे त्रस्त झाले आहेत़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने शासकीय कार्यालयांचे कामकाज बंद होते़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सर्व कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांची १०० टक्के उपस्थिती देऊन कामकाज सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यानुसार शहरात कार्यालये सुरु झाली असून तुरळक स्वरुपात नागरीक येऊ लागले आहेत़ शहरातील तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातही नागरिकांची ये-जा सुरु झाली आहे़ परंतु इतर कार्यालयांच्या तुलनेत येथील अधिकाºयांनी कोरोनामुक्तीचा अजब फंडा शोधून काढत बाहेरुन येणाºया कोणत्याही नागरिकाला प्रवेशच देऊ नये असे आदेश काढले आहेत़ यातून मग शेती संबधित दस्त, गाव नकाशे, ले-आऊट, बांधकाम परवानगी संबधी कागदपत्रांची पूर्तता यासह विविध कामांसाठी येणाºया नागरिकांना खिडकीतून आपले म्हणणे मांडून तेथून कागदपत्रे देण्याचा निर्णय घेतला़ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य असलेल्या निर्णयात मात्र सुविधा निर्माण करण्याचा अधिकारी आणि कर्मचाºयांना विसर पडला आहे़ येणारे नागरिक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बोळीतून भिंतीला लटकून खिडकीला लोंबकळत आपले मांडत असल्याचे चित्र याठिकाणी दरदिवशी दिसून येत आहे़ या बोळीत गवत, कचरा, घाण साचून आहे़ यात सापांची भिती असतानाही नागरिक नाईलाजाने खिडकीला लटकून म्हणणे मांडत आहेत़शहरातील इतर शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी मास्क, सॅनेटायझरचा वापर करुन येणाºयांसोबत संवाद करत असताना भूमी अभिलेख कार्यालयातील या प्रकारामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ हा आदेश नेमका कोणी काढला, याबाबत अधिकारी व कर्मचारी बोलण्यास तयार नाहीत़ कार्यालयात कोणी येऊ नये म्हणून सकाळ ते सायंकाळ दोन शिपाई वर्गीय कर्मचारी दारात थांबवून ठेवण्यात येतात़ केवळ याच कार्यालयात सुरु असलेल्या या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे़