शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मुक्तीची वंदना करुन भीमजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शहरातील बौद्ध समाज बांधव आणि विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शहरातील बौद्ध समाज बांधव आणि विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनी घरीच डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले़ यावेळी करण्यात आलेल्या बुद्ध वंदनेतून कोरोनामुक्त विश्व होऊन ‘सबका मंगल हो’ असे चिंतन करण्यात आले़जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती ही घरी राहून साजरी करण्याचा निश्चय केला होता़ यानुसार शहरातील विविध भागात राहणाऱ्या समाजबांधवांनी सकाळी पांढरे कपडे परिधान करत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, संत कबीर, सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन केले़ यानंतर बुद्ध वंदना करत महापुरुषांना अभिवादन केले़ दुधाळे शिवारातील कोकणी हिल, शहरातील आंबेडकर चौक, समता कॉलनी, शाहू नगर, गणेश नगर बुद्धविहार, सरगम कॉलनी, यासह विविध भागात नागरिक घरोघरी दिवसभर विविध उपक्रमातून महापुरुषांच्या विचारांवर चर्चा करत असल्याचे दिसून आले़ शहरातील काही संघटनांकडून आॅनलाईन पद्धतीने सोशल मिडिया गु्रप आणि यूट्यूब चॅनल सुरु करुन त्यावर प्रबोधनात्मक विषयांची मांडणी केली़ शहरातील काही सेवाभावी कुटूंबांनी गरजूंना अन्न वाटपासह, कोरडा शिधा वाटप करुन जयंती उत्सवासाठी संकलित केलेल्या रकमेचा विनियोग करण्यात आला़१४ एप्रिलच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलासह जिल्हा प्रशासनाकडून कार्यालयांमध्ये डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले़जिल्ह्यातील विविध भागात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत़ नंदुरबार शहरातील साक्री नाका येथील पुतळ्यावर रोषणाई करण्यात आली होती़ याठिकाणी प्रातिनिधिक स्वरुपात समाजबांधव, प्रशासनातील अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण केले़ जिल्ह्यातील इतरही ठिकाणी याचप्रकारे अभिवादन केले गेले़