शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मास्क बनले उदरनिर्वाहाचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

कोरोनाच्या साथीपूर्वी मास्कचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केला जात होता. प्रामुख्याने रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मास्कचा वापर ऑपरेशन ...

कोरोनाच्या साथीपूर्वी मास्कचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केला जात होता. प्रामुख्याने रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मास्कचा वापर ऑपरेशन थिएटरमध्ये वावरत असताना करत होते. डॉक्टरांशिवाय अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय एखाद्याने मास्क लावल्याचे दिसून आल्यास त्याच्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जात असे. मात्र, जेव्हा कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हापासून मास्कचा वापर सर्वांसाठीच बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व जण घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच आता मॅचिंगचे मास्क खरेदी करण्याकडे शहरवासीयांसह ग्रामीण भागात देखील मोठा कल निर्माण झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता मास्क वापराकडे जे दुर्लक्ष करतील अशा नागरिकांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्यांकडून किमान ५०० रुपये तरी दंड भरावा लागतो. हा दंड टाळण्यासाठी का होईना मास्कचा वापर सक्तीचा झाला आहे.

विविध प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध :- सध्या बाजारात विविध डिझाईनचे एन-९५ व विविध कंपन्यांचे दु-लेअर, थ्री लेअर अशा विविध प्रकारचे मास्क उपलब्ध झाले आहेत. पाच रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंतचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक अशा कार्टूनचे मास्कही बाजारात आले आहेत. तरुण-तरुणी ही आपल्याला आवडतील अशा वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळ्या प्रकारचे मास्क खरेदी करू लागले आहेत.

मास्कमधून रोजगार :- लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार संपुष्टात आले. तर अनेक महिला बेरोजगार झाल्या. प्रामुख्याने ज्या महिलांना शिवणकाम येते अशा महिलांनी मास्क बनविण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. घरी विविध प्रकारचे रंगीत कपडे आणून पाहिजे तशा आकाराचे रंगीबेरंगी मास्क शिवून विक्रीसाठी द्यायचे हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून जोमाने सुरू झाल्याने मास्क निर्मिती हे अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.