आरटीओ नाका हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे
By Admin | Updated: July 7, 2017 13:03 IST2017-07-07T13:03:09+5:302017-07-07T13:03:09+5:30
गुलीउंबर आरटीओ चेक नाक्यावरील कर्मचा:यांमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरटीओ नाका हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे
>ऑनलाईन लोकमत
नंदुरबार , दि.7 - गुलीउंबर आरटीओ चेक नाक्यावरील कर्मचा:यांमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर गुलीउंबर गावाजवळ आरटीओचा चेक नाका आहे. या ठिकाणी 5 जुलै रोजी रात्री वाहन तपासणी करताना ट्रकचालक इप्तारखान हुसैन नूर हुसैन व आरटीओ नाक्यावरील कर्मचारी पंकज राजनाथ त्रिपाठी यांच्यात ट्रक क्रमांक (जीजे 13-टी 7620) यामधील भार क्षमतेवरून वाद झाला. क्षमतेपेक्षा 300 किलो जास्त भार काढून टाकावा, असे त्रिपाठी यांनी सांगितले. वाद वाढत जाऊन मारहाण झाली. त्यात तीन जण किरकोळ जखमी झाले.
ट्रकचालक इप्तारखान हुसैन नूर हुसैन, रा.अक्कलकुवा यांच्या फिर्यादीनुसार, नाक्यावरील पंकज राजनाथ त्रिपाठी व तिवारी नामक कर्मचारी यांच्याकडे टोल भरल्याची पावती मागितली. त्याचा राग येऊन दोघांनी इप्तारखान यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून खिशातील 10 हजार रुपये काढून घेतले व त्यांच्या सोबत असलेल्या आणखी एकाला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्रिपाठी व तिवारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद टोल नाक्यावरील मॅनेजर पंकज त्रिपाठी यांनी दिली. जावेद करीम मक्राणी, इरफान हुसेन अख्तर हुसेन मक्राणी, रा.अक्कलकुवा व ट्रकमधील चार ते पाच जण यांना वाहनात क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याचे सांगितल्याचा राग येऊन त्यांनी लाकडी काठी, लोखंडी टॉमी, हॉकी स्टिकने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.