रेल्वेकडून संरक्षक भिंत बांधण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:11 IST2018-11-14T23:24:06+5:302018-11-15T00:11:05+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या सिन्नर फाटा बाजूने ५१० मीटर रुंदीची १० फूट उंचीची भिंत बांधण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे.

 The construction of the wall from the railway begins | रेल्वेकडून संरक्षक भिंत बांधण्यास सुरुवात

रेल्वेकडून संरक्षक भिंत बांधण्यास सुरुवात

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या सिन्नर फाटा बाजूने ५१० मीटर रुंदीची १० फूट उंचीची भिंत बांधण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. यामुळे रेल्वेस्थानक व रेल्वे कॉलनी परिसरातून येणे-जाणे बंद होणार आहे.  नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथील रेल्वेच्या रुग्णालयापासून १० फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयापासून रेल्वेची हद्द असलेल्या रेल्वे कॉलनीला वळसा घालून सिन्नर फाटा बाजूकडील नवीन तिकीटघरापर्यंत संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. ५१० मीटर रुंदीची भिंत बांधण्यात येत असून, ३२० मीटर रुंद भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. सिन्नर फाटा बाजूकडून रेल्वेस्थानकातून ये-जा करणाऱ्यांना संरक्षक भिंतीमुळे वळसा घालून यावे लागणार आहे. यामुळे सिन्नर फाटा, स्टेशनवाडी, गोदरेजवाडी भागातील रहिवाशांची गैरसोय होणार आहे.
अखंड भिंत उभारण्यास विरोध
रेल्वे प्रशासन स्वत:च्या जागेत सुरक्षितेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभारत असल्याने त्या भागातील रहिवाशांना नाशिकरोडला येण्यासाठी देवी चौक सिन्नर फाटा येथील जुना पादचारी पूल किंवा सिन्नर फाटा मारुती मंदिराकडून रस्ता मार्गे यावे लागणार आहे. त्या भागातील रहिवाशांनी प्रारंभी अखंड भिंत उभारण्यास विरोध केला होता. किंबहुना येण्या-जाण्यासाठी थोडी जागा सोडण्याची मागणी केली होती. मात्र सुरक्षितेतमुळे रेल्वे प्रशासनाकडून अखंड संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे सिन्नर फाटा रेल्वे कॉलनीलादेखील सुरक्षितता प्राप्त होणार आहे.

Web Title:  The construction of the wall from the railway begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.