शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम अभियंत्यास १० हजाराची लाच घेतांना शहाद्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : बांधकाम बिलाची रक्कम अदा करण्यासाठी ठेकेदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना शहादा पंचायत समितीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : बांधकाम बिलाची रक्कम अदा करण्यासाठी ठेकेदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना शहादा पंचायत समितीचे सहायक बांधकाम अभियंता ईश्वर सखाराम पटेल यांना रंगेहात अटक करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत लाचेची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी पंचायत समिती आवारात ही कारवाई केली. गृपग्रामपंचायत होळगुजरी व टेंभली येथे पेसा अंतर्गत गावातील विकास कामे केली. त्याचे एकूण बिल सहा लाख ४३ हजार रुपये झाले होते. त्यापैकी एक लाख रुपये कामासाठी शासनाकडून अ‍ॅडव्हान्स म्हणून मिळाले होते . उर्वरित पाच लाख ४३ हजार रुपयांच्या कामाच्या बिलाच्या फाइलवर बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता इश्वर सखाराम पटेल यांची सही बाकी असल्याने बिल मंजूर होत नव्हते. सदर बिलाची रक्कम मिळावी यासाठी ठेकेदार यांनी वेळोवेळी बांधकाम विभागाशी संपर्क साधला मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही व बिलही मिळाले नाही.ठेकेदार यांनी अभियंता ईश्वर पटेल यांची भेट घेतली असता पटेल यांनी बिलावर सही करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे ठेकेदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. १७ रोजी दुपारी पंचायत समिती आवारात १० हजाराची लाच घेतांना पटेल यांना रंगेहात पकडण्यात आले. शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाच लुचपत विभागाचे उपअधिक्षक शिरिष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिररराव, हवालदार उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली.दरम्यान, गेल्या आठवड्यात नंदुरबार पंचायत समितीत देखील बांधकाम विभागातील अभियंता जगदाळे यांना ८५ हजार रुपयांची लाख घेतांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आठवडाभरात ही दुसरी घटना घडल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.