शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

मंत्रीपदामुळे अक्कलकुव्यात काँग्रेसचे पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:36 PM

अनिल जावरे । लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांना नुकतेच राज्यमंत्रीमंडळात स्थान मिळाल्याने अक्कलकुवा तालुक्यातील ...

अनिल जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांना नुकतेच राज्यमंत्रीमंडळात स्थान मिळाल्याने अक्कलकुवा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाढलेल्या उत्साहामुळे अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या निवडणूक निकालावर मोठा परिणाम झाला आहे़ काँग्रेसने ६ गट आणि १४ गणांमध्ये यश मिळवल्याने तालुका काँग्रेसमय झाल्याचे निकालातून दिसून येत आहे़दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे व शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या तालुक्यात त्यांना केवळ प्रत्येकी दोनच गटांवर समाधान मानावे लागले असल्याचे दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे़ अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक तिरंगी लढत झाली असताना या तिरंगी लढतीत भांग्रापाणी गटात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस दिसून येत होती़ या गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांच्या पत्नी बाजूबाई किरसिंग वसावे यांनी या गटातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे़ प्रतिष्ठेच्या असलेल्या भगदरी गटात माजी जिल्हा परिषद सदस्य सीक़े़पाडवी यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून मोठ्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केला आहे़ दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्ष तर तिसºया क्रमांकावर शिवसेनेच्या उमेदवार व माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी आशाबाई पाडवी या होत्या़ पिंपळखुटा गटात भाजप व काँग्रेस या दोघांमध्ये टक्कर होती़ माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी त्यांच्या पत्नी निर्मलाबाई यांना उमेदवारी मिळवून देत विजश्री खेचून आणत गड शाबूत ठेवला आहे़ वेली गटात काँग्रेस व भाजप अशी सरळ लढत होती़ त्यात हिराबाई रविंद्र पाडवी यांनी निसटता विजय मिळवला असून विद्यमान सदस्य नितेश वळवी यांच्या पत्नी अवघ्या ३१ मतांनी पराभूत झाल्या आहेत़ होराफळी गटात माजी सभापती नटवर पाडवी यांच्या पत्नी निलूबाई पाडवी यांनी सर्वाधिक ७ हजार ५०९ मते मिळवित माजी सदस्या सुमनबाई बंडू वळवी यांचा पराभव केला आहे़मोरंबा गटातून काँग्रेसचे प्रताप आतºया वावे यांनी तर रायसिंगपूर गटात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमशा पाडवी यांचे पुत्र शंकर पाडवी यांनी प्रथमच निवडणूक लढवून विजय प्राप्त केला़ खापर गटातून भाजपाचे भूषण कामे यांनी काँग्रेसचे सुनील पाटील यांचा पराभव केला़ अक्कलकुवा गटात भाजपाचे कपिलदेव भरत चौधरी यांनी विजय प्राप्त केला़गंगापूर गटातून काँग्रेसचे जितेंद्र दौलतसिंग पाडवी यांनी विजय मिळवत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांचा पराभव केला़ या गटातील पराभव भाजपाला आत्मचिंतन करायला लावणारा आहे़ पंचायत समितीच्या २० गणांपैकी १४ ठिकाणी काँग्रेसने यश मिळवल्याने त्यांची सत्ता स्थापन होणार आहे़ पंचायत समितीत भाजपाचे चार तर शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले आहे़