नंदुरबारात प्लॉट खरेदीच्या वादातून मारहाण,परस्परविरोधी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:40 IST2018-06-04T12:40:34+5:302018-06-04T12:40:34+5:30

Conflicts of buying plot in Nandurbar, conflict, conflicting crimes | नंदुरबारात प्लॉट खरेदीच्या वादातून मारहाण,परस्परविरोधी गुन्हे

नंदुरबारात प्लॉट खरेदीच्या वादातून मारहाण,परस्परविरोधी गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्लॉट खरेदीच्या वादातून तिघांनी एकास मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केल्याची घटना शहाद्यात घडली.  दरम्यान, नरेश जैन यांनी देखील फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील व्यापारी प्रशांत विक्रम निकुंभे यांनी शहरातील संचेती मार्केटच्या पाठीमागे असलेल्या ठिकाणी प्लॉट खरेदी केला होता. त्या ठिकाणी ते खड्डे खोदत होते. त्यांच्या बाजुलाच प्लॉट असलेले नरेश संचेती यांनी निकुंभे यांना या ठिकाणी प्लॉट का खरेदी केला म्हणून विचारणा करून जातीवाचक शिविगाळ केली. तसेच मारहाण केली. याबाबत प्रशांत निकुंभे यांच्या फिर्यादीवरून नरेश संचेती, लालचंद संचेती, चंदुलाल संचेती सर्व रा.शहादा यांच्याविरुद्ध  शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक एम.बी.पाटील करीत आहे.
दरम्यान, नरेश लालचंद जैन यांनी देखील फिर्याद दिली. प्लॉटची मोजणी करीत असतांना तेथे आलेले प्रशांत विक्रम निकुंभ व इतरांनी वाद घालून शिविगाळ केली. प्रशांत निकुंभे, संतोष बान्हे, अतिष चौधरी यांनी लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केले. जैन यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला   आहे.
 

Web Title: Conflicts of buying plot in Nandurbar, conflict, conflicting crimes