शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

भाजपसाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 8:08 PM

राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पारंपारिक काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत ...

राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पारंपारिक काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत आहे. भाजपच्या विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने आपली जागा कायम राखण्यासाठी त्यांनी पुर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे काँग्रेसने ३५ वर्षात प्रथमच उमेदवार बदलला असून सलग सहा वेळा आमदार असलेले अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना उमेदवारी देवून पुन्हा आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकुण ११ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट आहे. मतदारसंघात एकुण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यात चार ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यापैकी एका ठिकाणी स्वत: काँग्रेसचे उमेदवार के.सी.पाडवी हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. भाजपचे केवळ दोन आमदार आहेत. त्यापैकी एका ठिकाणी डॉ.हिना गावीत यांचे वडील आमदार डॉ.विजयकुमार गावीत हे प्रतिनिधीत्व करीत आहे. यावेळी प्रथमच दोन्ही पक्षातील सुशिक्षीत उमेदवार उच्चशिक्षीत असल्याने लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदारसंघात ६५ टक्के आदिवासी मतदार असून ३५ टक्के बिगर आदिवासी मतदार आहेत. दोन्ही उमेदवारांनी बिगर आदिवासी मतदारांची मते मिळविण्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय भाजपचे बंडखोर उमेदवार तसेच बहुजन समाज पार्टी, वंचीत बहुजन आघाडी, भारतीय ट्रायबल पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी यांच्यासह चार अपक्ष उमेदवार आहेत. निवडणुकीच्या प्रमुख स्पर्धेत हे उमेदवार नसले तरी त्यांना मिळणाºया मतांवर बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे मतांची विभागणी आणि जातीय ध्रुवीकरण यावरच भाजप आणि काँग्रेसचा जय-पराजयाचे समिकरण अवलंबून आहे.