धूळ उडत असल्याने दुचाकीधारकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:33 IST2019-11-16T12:33:15+5:302019-11-16T12:33:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा ते बुपकरीर्पयतच्या रस्त्याची दैनावस्था झाली असून उडणा:या धुळीमुळे दुचाकीधारकांना त्रास सहन करावा लागत ...

धूळ उडत असल्याने दुचाकीधारकांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा ते बुपकरीर्पयतच्या रस्त्याची दैनावस्था झाली असून उडणा:या धुळीमुळे दुचाकीधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे या रस्त्यावरुन नियमित ये-जा करणा:यांना खड्डय़ांमुळे पाठदुखीचे आजारही होत आहेत. संबंधित विभागाने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा ते बुपकरीर्पयतचा रस्ता गेल्या दीड वर्षापासून खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डय़ांमुळे या रस्त्यावर नियमित अपडाऊन करणा:यांना पाठदुखीचा आजार जाणवत आहे. रस्त्यावरील खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात समोरासमोर वाहने आल्यास अपघातही होत आहेत. मध्यंतरी खड्डे बुजविण्याचा प्रय} झाला. मात्र जे खड्डे बुजवले त्यात मुरूम टाकल्याने मोठे वाहन गेल्यावर मागे मोठय़ा प्रमाणावर धूळ उडत आहे. लहान वाहनधारकांना उडणा:या धुळीचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊन त्वचारोग होत आहे. तर डोळ्यात जाऊन डोळे स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात समोरुन वाहन आले तर अपघात होत आहेत. दोन महिन्यापूर्वी खासदार डॉ.हीना गावीत यांनी या मार्गाची पाहणी केली होती. संबंधित ठेकेदाराला तंबी देत अपूर्ण काम लवकर पूर्ण करण्याचे सांगितले. मात्र या गोष्टीला दोन महिने होऊनही या रस्त्यावर काम झालेले नाही. प्रकाशा गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर म्हणजे गॅस गोडाऊनजवळ रस्ता खराब आहे. पुढे कोकणीमाता मंदिर ते डामरखेडा गावार्पयत खड्डय़ांचे साम्राज्य आहे. डामरखेडा ते बुपकरीर्पयत वाहन चालवणे म्हणजे आटय़ापाटय़ा खेळण्यासारखे आहे. वारंवार तक्रार करूनही संबंधित ठेकेदार याकडे लक्ष देत नाही, अशी संतप्त प्रक्रिया वाहनधारक व्यक्त करीत आहेत. येत्या आठ दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात न केल्यास प्रकाशा व डामरखेडा ग्रामस्थांनी रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.