शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याचा विना अपघात उत्पादनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रत्येक कर्मचाऱ्याने दैनंदिन काम करतांना आपत्कालीन अग्नी उपद्रव व्यवस्थापन कार्यक्रमातील प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनाचा उपयोग ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : प्रत्येक कर्मचाऱ्याने दैनंदिन काम करतांना आपत्कालीन अग्नी उपद्रव व्यवस्थापन कार्यक्रमातील प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनाचा उपयोग करावा. कारखान्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या साहित्याचा नित्य वापर करावा. सन २०२० हे वर्ष ‘विना अपघात उत्पादन’ साजरा करावयाचे आहे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी मॉकड्रील कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दर सहा महिन्यात आपात्कालीन अग्नी उपद्रव व्यवस्थापनेचा आणि प्रात्यक्षिकाचा व मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेतला गेला. अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक पी.आर. पाटील तर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून धुळे येथील कॉलेज आॅफ फायर इंजिनिअरींगचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य सुनील सुदाम चौधरी, शहादा नगर परिषदेचे कर निरीक्षक माजी सैनिक सचिन महाडीक, पंप आॅपरेटर रवींद्र चव्हाण, अग्निशामक वाहनचालक प्रकाश चौधरी, फायरमन धर्मा नाईक, धुळे येथील धनेश जाधव, जनरल मॅनेजर अशोक पाटील, अतिरिक्त मुख्य अभियंता धनंजय शेठे, विठ्ठल बेंद्रे, अभियंता मिलिंद पटेल, शरद पाटील, डिस्टीलरी विभागाचे व्यवस्थापक के.बी. पाटील, कामगार अधिकारी प्रविण पाटील, सहायक व्यवस्थापक पी.ओ. सराफ तसेच एक्साईज विभागाचे पायमुडे व त्यांचे अधिकारी, कारखान्याचे लेबर आॅफिसर पुरूषोत्तम पाटील, सर्व केमिस्ट इंजिनिअर उपस्थित होते.पाटील पुढे म्हणाले की, शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी संरक्षणाकरीता लागणारे संपूर्ण साहित्य कधीच अपूर्ण पडू दिले जात नाही. उपकरणे वापरल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळेस बोलतांना प्राचार्य सुनील चौधरी म्हणाले की, मॉकड्रील कार्यक्रम हा घेतला गेला पाहिजे. यातून कामगारांना अग्निरोधक फायर एक्सटींग्शर हाताळणे सोपे जाते व नेहमी स्मरणात राहते. म्हणजे एखादी आपत्ती ओढून आली तर त्यावेळेस नेमके कोणत्या प्रकारची आग आहे ही ओळखून त्यावर कोणते फायर एक्सटींग्शर वापरले पाहिजे याचे स्मरण त्वरित होते व अनर्थ टळतो, अनेकांचे जीव वाचू शकतात. याबाबत त्यांनी प्रत्यक्षिक करून घेत मार्गदर्शन केले.याप्रसंगी शहादा नगरपालिकेचे अधिकारी सचिन महाडीक यांनी अग्नीचे प्रकार समजावून सांगितले. कोणत्या ठिकाणी कशापासून आग लागू शकते ते विझविण्यासाठी कोणते उपकरण वापरले पाहिजे व काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत माहिती दिली. या वेळी कारखान्याचे अधिकारी, पदाधिकारी व कमगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे कामगार अधिकारी प्रविण पाटील यांनी केले.