College women's cricket tournament begins | महाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेस सुरुवात
महाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेस सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कवियित्री बहिणाबाई उत्तर महाविद्यालयमार्फत महिलांसाठी आंतरविभागीय स्पर्धा पथराई येथे घेण्यात येत आहे. यात तिन्ही जिल्ह्यातील संघ सहभागी झाले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या संचालीका इलाबाई गावीत, देविदास बोरसे, प्रा. डॉ. ईश्वर धामणे, प्राचार्य डॉ.भारत चाळसे, प्रा. ए. आर. कांबळे, डॉ. टी. एल.दास, डॉ. हसीन तडवी, प्रा. राठोड, डॉ. संतोष बडगुजर भागूराव जाधव, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी विद्यापीठांतर्गत तिन्ही जिल्ह्यांमधील महिलांचे संघ सहभागी झाले आहेत. पथराई येथील सटेडीयमवरच नव्हे तर नंदुरबार जिल्ह्यात महिलांच्या क्रिकेट स्पर्धा प्रथमच होत आहे. त्यामुळे हे सामने पाहण्यासाठी जिल्हाभरातील क्रिकेटप्रमींनी गर्दी केली आहे.

Web Title: College women's cricket tournament begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.