७०० विद्यार्थ्यांनी केले सामूहिक सूर्यनमस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:32 IST2020-01-02T11:31:49+5:302020-01-02T11:32:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आरोग्यमय व व्याधीमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यासाठी ७०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक सूर्यनमस्काराने नवीन ...

७०० विद्यार्थ्यांनी केले सामूहिक सूर्यनमस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आरोग्यमय व व्याधीमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यासाठी ७०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक सूर्यनमस्काराने नवीन वर्षाचे स्वागत केल्याचा उपक्रम शहरातील हिग़ो़श्रॉफ हायस्कूलमध्ये पार पाडला़ १ जानेवारीच्या सकाळी झालेल्या या उपक्रमात शिक्षकांचाही सहभाग होता़
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, चेअरमन अॅड़ रमणलाल शहा, सचिव डॉ़ योगेश देसाई, शिक्षणाधिकारी एम़व्हीक़दम, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, योग विद्या धामचे जगदीश सोनी, बळवंत निकुम, ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ पितांबर सरोदे, मनिष शाह, चंदर मंगलाणी प्रकाश चौधरी, म्उपस्थित होते़
कार्यक्रमात माहिती देताना मुख्या्ध्यापिका सुषमा शाह यांनी आरोग्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम होत असल्याची माहिती दिली़ शिक्षकांच्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी वर्तुळाकार परिघ रचना तयार करुन मध्यभागी सूर्याची प्रतिकृती तयार केली होती़ विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमात उपस्थित मान्यवरांनीही सहभाग घेत सूर्यनमस्कार केले़
सूत्रसंचालन चेतना पाटील यांनी तर आभार राजेश शाह यांनी मानले़
दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले़ सांस्कृतिक कार्यक्रमांसह रात्री उशिरापर्यंत स्रेहमेळावे सुरु होते़ नंदुरबार शहरातील मिशन कंपाउंडमध्ये नवीन वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले़ तर शहरातील विविध भागात युवकांकडून डीजे सह पारंपरिक वाद्यांवर ताल धरत नवीन वर्षाचे स्वागत केले होते़ रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स व ढाबे सुरु होते़ पोलीसांकडून या सर्व ठिकाणांवर वेळोवेळी भेटी देऊन माहिती घेण्यात येत होती़