दरड कोसळल्याने गोरजाबारी रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:33 IST2019-07-09T12:33:47+5:302019-07-09T12:33:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील रायसिंगपूर-भराडीपादर- गोरजाबारी ते खाई रस्त्यावर दरड कोसळल्याने चार दिवसांपासून रस्ता बंद पडला ...

The collapse of the Gorkarbari road is closed due to the crackdown | दरड कोसळल्याने गोरजाबारी रस्ता बंद

दरड कोसळल्याने गोरजाबारी रस्ता बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील रायसिंगपूर-भराडीपादर- गोरजाबारी ते खाई रस्त्यावर दरड कोसळल्याने चार दिवसांपासून रस्ता बंद पडला आहे.
सातपुडय़ात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने रायसिंगपूर-भराडीपादर ते गोरजाबारी-खाई या रस्त्यादरम्यान गोरजाबारीपासून एक किलोमीटर अंतरावर दोन ठिकाणी दरड तर एक दोन ठिकाणी मातीचा मलबा कोसळला आहे. त्यामुळे हा रस्ता बंद पडला असून दुचाकीधारकांनी रस्त्यावरील दगड बाजूला करून दुचाकी निघण्यापुरता रस्ता सुरू केला आहे. मात्र इतर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रात्रीच्यावेळी याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्यावरील दगड व माती तात्काळ उचलून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
 

Web Title: The collapse of the Gorkarbari road is closed due to the crackdown