ढगाळ वातावरण : शेतकऱ्यांनो गहू, हरभरा या पिकांना जपा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:30 IST2020-12-17T13:30:20+5:302020-12-17T13:30:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रब्बीच्या सरासरी क्षेत्राइतके यंदाही क्षेत्र असले तरी यंदा ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पिकांना फटका ...

ढगाळ वातावरण : शेतकऱ्यांनो गहू, हरभरा या पिकांना जपा!
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रब्बीच्या सरासरी क्षेत्राइतके यंदाही क्षेत्र असले तरी यंदा ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पिकांना फटका बसणार आहे. यामुळे पिकांची उत्पादकता देखील कमी होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
यंदा हिवाळ्यात अर्थात येत्या काही महिन्यात अधूनमधून ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचा प्रत्यय डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच आला आहे. सलग तीन दिवस पाऊस झाला तर पाच दिवस ढगाळ वातावरण राहिले. यामुळे पेरणी झालेला गहू, हरभरा, मका, करडई या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यापुढील काळात देखील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलका पावसाचाही अंदाज आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी पिकांचे आणि त्यावरील विविध किड, रोग यांचा प्रादुर्भाव यापासून पिकांचे संरक्षण या दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ६२४ हेक्टर...
जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ६२४.६८ हेक्टर इतके आहे. जवळपास सर्वच क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गेल्या वर्षी ५९०.५२ हेक्टर क्षेत्रात रब्बीचा पीकपेरा होता. यंदा नेहमीप्रमाणे गहू पिकाने सर्वाधीक क्षेत्र व्यापले आहे. त्याखालोखाल हरभरा आहे.
असे आहे जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
गहू २११.२३
ज्वारी १६०.३३
हरभरा २०४.०४
मका ३३.८२
करडई १.५७
पाऊस झाल्यास कुठल्या पिकांना बसणार फटका
यापुढील काळात पाऊस झाल्यास हरभरा, गहू या पिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. याशिवाय पपई, आंबा या फळपिकांवरही परिणाम होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. परंतु यापुढे पक्व अवस्थेतील पिकांना धोका आहे.
शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावी
ढगाच्छादित वातावरणात भुरी रोगाची वाढ कित्येक पटीने वाढते. रब्बी हंगामात ढगाळ हवामान असल्यास अधिक खबरदारी घ्यावी. मात्र, हलकासा पाऊस झाल्यास भुरी रोगाचे बीजाणू फुटून मृत होतात. पाऊस संपताच भुरी रोगाच्या डागांमधून बीजाणूंची वाढ वेगाने होते.
शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावी
ढगाच्छादित वातावरणात भुरी रोगाची वाढ कित्येक पटीने वाढते. रब्बी हंगामात ढगाळ हवामान असल्यास अधिक खबरदारी घ्यावी. मात्र, हलकासा पाऊस झाल्यास भुरी रोगाचे बीजाणू फुटून मृत होतात. पाऊस संपताच भुरी रोगाच्या डागांमधून बीजाणूंची वाढ वेगाने होते.