शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यात पाण्यासाठी नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

लाखाणी पार्कमधील मुस्लीम बांधवांचा रमजानचा महिना सुरू आहे. त्यात पाण्यासाठी मुस्लिमांचे हाल होत आहेत. खास करून मुस्लीम महिलांना मनस्ताप ...

लाखाणी पार्कमधील मुस्लीम बांधवांचा रमजानचा महिना सुरू आहे. त्यात पाण्यासाठी मुस्लिमांचे हाल होत आहेत. खास करून मुस्लीम महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तहानलेल्या पावलांनी लाखाणी पार्कमधील मुस्लिम महिलांनी नगरपालिका व तहसील कार्यालयात जाऊन पाणीटंचाई दूर करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी एजाज शेख, जयंतीलाल अग्रवाल, प्रणव सोनार, स्वप्निल मिस्त्री, अनिल सोनार, शाहरूख खाटीक, विवेक सोनार, जितेंद्र आहिरे आदी उपस्थित होते.

साहेब... हमारा रोजा चालू है, पाणी मिल नही रहा है, हमे पाणी दो, अल्लाह आपको दुवा देगा, अशी मुस्लीम महिलांनी हाक दिली. यावर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी तत्काळ उपाययोजनांबाबत नगरपालिकेला आदेश दिले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भरत गावीत यांनी पालिकेच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. एजाज शेख यांनी देखील नगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. भरत गावीत व परिसरातील रहिवासी परवेज लाखाणी यांनी अनेक वेळा नागरिकांना पाणी दिले आहे.

लहान चिंचपाडा व लाखाणी पार्कमधील पाण्याची टाकी देखील नादुरुस्त आहे. त्यामुळे लाखाणी पार्कमधील रहिवाशांना पाणीटंचाई जाणवत आहे. पालिका प्रशासनाने नियमित पाच टँकर पाणीपुरवठा दररोज करावा, त्यात मध्येच खंड पडू नये, यासाठी सतर्क राहून लक्ष द्यावे. लहान चिंचपाडा व लाखाणी पार्कमधील पाण्याची टाकी दुरुस्त करून कायम स्वरूपी सोय करावी, अशी मागणी होत आहे. टँकरने पाणीपुरवठा न झाल्यास लाखाणी पार्कमधील संपूर्ण रहिवाशांना आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरणार नाही, असे निवेदन तहसीलदार मंदार कुलकर्णी व पालिका पाणीपुरवठा अभियंता सचिन अग्रवाल यांना दिले. तहानलेल्या लोकांना पाणी देणे हा सर्वात मोठा धर्म आहे, परंतु पालिका प्रशासन या धर्माला जागेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.