बाजारात मिरचीचा तडका अन् कांदा दरवाढीचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:29 IST2019-10-31T12:29:05+5:302019-10-31T12:29:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सहा दिवसांपासून बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याचा फटका शेतक:यांसह सामान्यांना बसत आह़े मार्केट सुरु ...

Chilli peppers and onion prices rise in the market | बाजारात मिरचीचा तडका अन् कांदा दरवाढीचा भडका

बाजारात मिरचीचा तडका अन् कांदा दरवाढीचा भडका

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सहा दिवसांपासून बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याचा फटका शेतक:यांसह सामान्यांना बसत आह़े मार्केट सुरु असताना मिरचीला  3 हजार 800 रुपये प्रतीक्विंटलर्पयत दर मिळाले होत़े परंतू व्यवहार बंद असल्याने शेतकरी या दरांपासून वंचित Aराहिले असून कांदा आवकही थांबल्याने किरकोळ बाजारात कांदा दरवाढीचा भडका उडाला आह़े           
गेल्या महिन्यात नंदुरबार बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात 3 हजार 800 ते 4 हजार 200 रुपये प्रतीक्विंटल दरार्पयत कांद्याची विक्री करण्यात आली होती़ यातून किरकोळ बाजारातील भाव हे प्रतीकिलो 60 रुपयांर्पयत जाऊन पोहोचले होत़े दिवाळीपूर्वी बाजारात किरकोळ अशी आवक झाल्याने दर काही अंशी कमी झाले होत़े परंतू 24 ऑक्टोबरपासून कांदा आवकच नसल्याने किरकोळ बाजारातून कांदा नाहिसा झाला आह़े यातून सामान्यांच्या घरासोबत हॉटेल व्यावसायिकांनी कांद्यांऐवजी पर्यायी साहित्य वापरुन ग्राहकसेवा सुरु ठेवावी लागत असल्याचे दृश्य दिसून येत आह़े व्यापा:यांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी बाजार समिती सुरु होणार आह़े परंतू त्यात कांदा आवक होणार किंवा कसे याबाबत माहिती समोर आलेली नाही़   
बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नंदुरबार तालुक्यासह लगतच्या धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील उत्पादक येथे कांदा विक्रीसाठी आणतात़ परंतू गेल्या महिन्यापासून वाढीव दर मिळत नसल्याने या शेतक:यांनी नंदुरबार बाजाराकडे पाठ फिरवली आह़े धनत्रयोदशीपूर्वी नंदुरबार बाजारात 2 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दर देऊनही केवळ 5 क्विंटलर्पयत कांदा आवक झाल्याची माहिती आह़े दरम्यान नंदुरबार बाजार समितीत केंद्र शासनाने परदेशातून आयात केलेला कांदा नंदुरबारात दाखल होणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत़ वाशी येथील बाजारात पडून असलेला हा कांदा येथील व्यापारी खरेदी करण्याची शक्यता आह़े 

नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात यंदाच्या उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसल्याने शेतक:यांना कांदा लागवड करणे शक्य झाले नव्हत़े यामुळे कांदा उत्पादनच आलेले नव्हत़े  यामुळे शेतकरी व व्यापा:यांची भिस्त ही पावसाळी कांद्यावर होती़ परंतू जुलै ते सप्टेंबर या दरम्यान अतीवृष्टीमुळे लागवड केलेला कांदा खराब होऊन कांदा उत्पादक शेतक:यांना मोठा फटका बसला आह़े पूर्व भागात ब:याच ठिकाणी सप्टेंबर अखेरीर्पयत कांदा लागवड होत होती़ हे उत्पादन नोव्हेंबर अखेरीस येणार आह़े 

मिरचीचे आगार अशी ओळख असलेल्या नंदुरबारात धनत्रयोदशीपूर्वी मिरची आवक सुरु झाली होती़ यात एकाच दिवसात  500 क्विंटल मिरचीची आवक झाली होती़ प्रामुख्याने लाली, व्हीएनआर आणि जीफोर या वाणांचा समावेश होता़ व्यापा:यांनी तिघा वाणांना प्राधान्याने खरेदी केले होत़े यातून शेतक:यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या़ परंतू बाजार बंद झाल्याने शेतक:यांना थांबावे लागले आह़े  व्यापा:यांकडून लाली या वाणाला प्रती क्विंटल 2 हजार 300 ते 2 हजार 500, व्हीएनआर 2 हजार 500 ते 2 हजार 900 तर जी फोर या मिरची वाणाला 3 हजार 200 ते 3 हजार 600 रुपये प्रतीक्विंटल दराने खरेदी करण्यात आली होती़ 1 नोव्हेंबरपासून सुरु होणा:या बाजारात हेच दर कायम राहतात की त्यात वाढ होते, याकडे शेतक:यांचे लक्ष लागून आह़े सलग सहा दिवस बाजार बंद असल्याचा फटका बसला होता़ यात पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी मिरचीवर पांढरी माशी आणि चुरडामुरडा निर्माण झाला होता़ यावर तोडगा म्हणून शेतक:यांनी फवारणी असली तरीही बाजार उघडा राहिला असता, तर वाढीव खर्च करण्याची वेळ आली नसती असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत़ 
 

Web Title: Chilli peppers and onion prices rise in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.