वालंबातील बालकांची अंगणवाडीत जाण्यासाठी नदीतील पाण्यातून कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:57 IST2020-08-02T12:57:28+5:302020-08-02T12:57:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा ...

वालंबातील बालकांची अंगणवाडीत जाण्यासाठी नदीतील पाण्यातून कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र नाही. त्यामुळे या पाड्यावरील लहान चिमुकल्या मुलांना व स्तनदा माता, गरोदर माताना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्यामध्ये येणाऱ्या नदीवर पुल नसल्याने नदीतूनच चौपलाईपाडाच्या अंगणवाडी केंद्रात जावे लागत आहे. या वेळी डोंगर दºयातील पाणी अचानक नदीला येवून धोकेदायक ठरू शकते तरी वालंबाच्या कारभारी पाड्यासाठी स्वतंत्र अंगणवाडी केंद्राला मंजुरी देवून ती अंगणवाडी सुरू करण्यात ची आवश्यकता आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र नसल्याने येथील लहान मुलांना, स्तनदा माता व गरोदर माता, किशोर वयीन मुलीना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील चोपलाईपाडा अंगणवाडी केंद्रात जावे लागते. या कारभारी ते चोपलाईपाडा दरम्यान नदी येत असून, या नदीवर पुल नसल्याने नदीच्या पाणीमधून लहान मुले जात असताना डोंगराºयात जास्त पाऊस होवून अचानक नदीत पाणी वाढल्यास धोकेदायक ठरू शकते. तरी वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यास कारभारी पाड्यातील शून्य ते सहा वयोगटातील ३८ ते ४० लहान चिमुकल्यांना स्तनंदा व गरोदर माताना सोयीचे होणार आहे. तरी वालंबाच्या कारभारी येथे अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सातपुड्यातील दुर्गम अति दुर्गम भागातील गावांचे पाडे पाच ते सात किलोमीटर अंतरावर विस्तारलेले आहेत. अनेक ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी केंद्र नसल्याने तेथील बालकांना लगतच्या पाड्यातील शाळेत अथवा अंगणवाडीत जावे लागते. एका पाड्याहून दुसºया पाड्यावर जाण्यासाठी बहुतांश ठिकाणी रस्तेही नाही. पाय वाटेनेच डोंगराचा चढाव चढून अनेक ठिकाणी नदी नाले ओलांडून जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात ते धोकेदायक ठरते. त्यामुळे याबाबतचे योग्य सर्वेक्षण होवून दुर्घटना टाळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे.