बालकांनाही कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:25 IST2020-10-12T12:25:37+5:302020-10-12T12:25:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील बालकांनी कोरोनाशी चांगला लढा दिल्याचे चित्र आहे. ० ते १२ वयोगटातील बालकांचा विचार ...

बालकांनाही कोरोनाचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील बालकांनी कोरोनाशी चांगला लढा दिल्याचे चित्र आहे. ० ते १२ वयोगटातील बालकांचा विचार करता एकुण बाधीत रुग्णांपैकी केवळ ३९१ अर्थात ७.१० टक्के बालकांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जिल्ह्यात बालमृत्यू व कुपोषणाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. असे असतांना कोरोनाला मात्र जिल्ह्यातील बालकांनी दूरच ठेवल्याचे चित्र आहे. त्याला कारणे विविध असतील तरीही येत्या काळात आणखी दक्षता घेणे आवश्यक ठरणार आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पुर्णपणे दूर झालेला नाही. सद्या रुग्ण संख्या कमी झाली असली तरी हिवाळ्यात कोरोना पुन्हा डोके वर काढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे सुतोवाच केले जात आहे. त्यामुळे पालक आधीच चिंतेत पडले आहे.
- एकुण पुरूष बाधीतांमध्ये मुलांचे प्रमाण ७.७९ टक्के.
- एकुण महिला बाधीतांमध्ये मुलींचे प्रमाण ६.५६ टक्के.
- २३७ बालके बाधीत
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २३७ मुलं बाधीत झाले आहेत. ही आकडेवारी अर्थातच ० ते १२ वयोगटातील आहे. अगदी दीड वर्षाचा मुलालाही कोरोना झालेला आहे. या सर्वच मुलांनी कोरोनावर मात केली आहे. सुदैवाने कुणाचाही यात बळी गेलेला नाही.
- १५४ बालिका बाधीत
बाधीत बालकांमध्ये एकुण १५४ मुली बाधीत झाल्या आहेत. त्यात दोन वर्षाच्या मुलीचाही समावेश होता. सर्व बाधीत बालिकांनी कोरोनावर मात केलेली आहे. एकुण दोन हजार ३०२ महिला बाधीत झाल्या होत्या. त्यात बालिकांचे प्रमाण ६.५६ टक्के राहिले.
- जी बालकं कोरोना बाधीत झाली ती एकतर आपल्या बाधीत आई किंवा वडिलांच्या संपर्कात आलेली होती. सध्या शाळा बंद असल्याने त्यांना बाहेरून बाधा होण्याचा संभव नाही. त्यामुळे बालकांना अद्यापही बाहेर सार्वजनिक ठिकाणी काढणे म्हणजे मोठे जिकरीचे ठरणार आहे.
बालकांना सार्वजनिक ठिकाणी नेऊ नये. बालकांची प्रतिकारशक्ती कमी राहत असल्याने त्यांना मल्टीव्हीटॅमिन असलेले पदार्थ खाऊ घालावे. घरात कुणी आजारी असल्यास त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवावे. आजार व्यक्तींजवळ जाऊ देऊ नये. वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याची सवय लावावी.
-डॉ.अरविंद पाटील,
बालरोग तज्ज्ञ. नंदुरबार.