चेतक फेस्टीवल : रेसिंग स्पर्धेत ‘बेनजीर’ने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 13:25 IST2017-12-27T13:25:47+5:302017-12-27T13:25:53+5:30

Chetak Festival: 'Benazir' hit the racing championship | चेतक फेस्टीवल : रेसिंग स्पर्धेत ‘बेनजीर’ने मारली बाजी

चेतक फेस्टीवल : रेसिंग स्पर्धेत ‘बेनजीर’ने मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : सारंगखेडा ता़ शहादा येथे चेतक फेस्टीवलअंतर्गत मंगळवारी घोडय़ांची रेसिंग स्पर्धा घेण्यात आली़ यात, जुन्नर पुणे येथील अमित खत्री यांच्या ‘बेनजीर’ या घोडय़ाला प्रथम क्रमांक मिळाला़ त्याला 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आल़े 
व्दितीय क्रमांक साकोरा नाशिक येथील प्रवीण पवार यांच्या श्यामा या घोडय़ाने पटकावला त्याला 51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात  आल़े 
तृतीय क्रमांकाचे 31 हजार रुपयांचे पारितोषिक देवीदास चव्हाण यांच्या सज्या या घोडय़ाने पटकावला़
 स्पर्धेत एकूण 36 घोडय़ांनी सहभाग घेतला होता़ 
या स्पर्धेसाठी युपी, गुजरात, राजस्थान येथून मोठय़ा संख्येने घोडे सहभागी झाले होत़े
 

Web Title: Chetak Festival: 'Benazir' hit the racing championship