शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर खाद्यतेल स्वस्त, २० ते ३० रुपयांची घसरण, सर्वसामान्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

महागाईमुळे गृहिणींना स्वयंपाक करताना तेलासाठी हात अखडता घ्यावा लागत असल्याने याचा परिणाम स्वयंपाकावर दिसून येत होता. पूर्वीचे रुचकर पदार्थ ...

महागाईमुळे गृहिणींना स्वयंपाक करताना तेलासाठी हात अखडता घ्यावा लागत असल्याने याचा परिणाम स्वयंपाकावर दिसून येत होता. पूर्वीचे रुचकर पदार्थ कमी झाले होते. आता तर तेलाचे दर काही प्रमाणात का होईना कमी झाले आहेत, त्यामुळे गृहिणींच्या चेहऱ्यावर सुखद हास्य दिसत आहे.

पूर्वी सूर्यफुलाची लागवड करीत होतो; परंतु सूर्यफुलाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्याची राखण करणे खूप महत्त्वाचे असते. कारण पक्षी या पिकाची हानी करतात. पूर्वी कुटुंब एकत्र येऊन अशी शेती करायचे. त्यामुळे पीक राखणीसाठी मदत व्हायची. या पिकासाठी श्रम जास्त आणि उत्पन्न कमी म्हणून सूर्यफुलाची शेती करणे बंद केले आहे.

-संजय धनराज मराठे, शेतकरी, ब्राह्मणपुरी, ता. शहादा

तेल उत्पादकांच्या मते जिल्ह्यातील शेंगदाणा, सूर्यफुलाचे उत्पादन गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात घटले आहे. कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने तेल उद्योगही बंद पडले आहेत. या उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास तेलाचे दर नियंत्रणात येऊ शकतात.

-संतोष फकिरा पाटील, शेतकरी, सुलतानपूर, ता.शहादा

गृहिणींचे बजेट कोलमडले

गेल्या वर्षीपासून हळूहळू तेलाचे भाव गगनाला भिडत चालले होते. त्यातच सोयाबीन तेल फिल्टर होऊन येत असल्याचे बोलले जात असले तरी कोणत्या ब्रॅण्डचे किती शुद्ध तेल येते यावरही विचार केला जात आहे. एकंदरीत महागाईचा भडका सामान्यांच्या आवाक्यात नाही हे स्पष्ट असले तरी शेवटी जगण्याची उमेद कोण सोडेल आणि सोडणार तरी कशी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला होता. आता काही प्रमाणात खाद्यतेलाचे भाव घटल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो)

आधीचे आताचे

सोयाबीन- १६५ १४०

शेंगदाणा - १८५ १६५

सूर्यफूल - १७५ १७२

पामतेल - १५५ १२७