लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 20 वर्षात प्रथमच प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार सध्या प्रभारी प्रशासकावर आह़े मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनय गौडा हे खाजगी कारणामुळे महिन्याच्या रजेवर गेले असून इतरही अधिकारी बदलून गेल्याने येथे शुकशुकाट आह़े जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांची रायगड जिल्हा परिषदेत बदली झाली होती़ त्यांचा पदभार रोहयोचे उपजिल्हा समन्वयक अनिकेत पाटील यांना देण्यात आला आह़े दरम्यान मंगळवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संदीप माळोदे यांनी मंगळवारी अनिल सोनवणे यांना तर ग्रामपंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांनी नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांच्याकडे पदभार सोपवला़ दोघेही आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी बुधवारी रुजू होणार असल्याची माहिती आह़े जिल्हा परिषदेत तूर्तास बदली झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे व स्वच्छता विभागाच्या डॉ़ सारिका बारी हे कामकाज पहात आहेत़ त्यांच्याजागी अधिकारी आल्यानंतर ते ही पदभार सूपूर्द करणार असल्याचे बोलले जात आह़े अधिका:यांच्या अचानक झालेल्या बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर मोठा परिणाम दिसून येत आह़े आधीच पदाधिका:यांविना असलेली जिल्हा परिषद आता अधिका:यांविना झाल्याने वैयक्तिक लाभासह इतर योजनांचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े शिक्षण विभागही प्रभारींच्याच ताब्यात असल्याने कामांवर परिणाम होत असल्याचे बोलले जात आह़े
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचा विवाह असल्याने ते 9 ऑगस्टपासून रजेवर आहेत़ चार महिन्यांपासून त्यांनी शासनाकडे रजेसाठी परवानगी मागितली होती़ ती अखेर मंजूर करण्यात आली आह़े पूरपरिस्थिीतून मार्ग काढण्यासाठी पूरहानी कार्यक्रम राबवण्याबाबत पक्ष संघटनांकडून मागणी करण्यात येत आह़े