शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्याचे शतकपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना रुग्णांच्या संख्येत नंदुरबार शहरासह तालुक्याने शतक पुर्ण केले आहे तर धडगाव तालुक्याने सुदैवाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना रुग्णांच्या संख्येत नंदुरबार शहरासह तालुक्याने शतक पुर्ण केले आहे तर धडगाव तालुक्याने सुदैवाने खातेही खोलले नसल्याची स्थिती आहे. नवापूर तालुक्यानेही चांगला कंट्रोल राखत एका रुग्णाच्या वर संख्या जाऊ दिली नाही. दुसरीकडे कोवीड तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या देखील नंदुरबार तालुक्यातच सर्वाधिक अर्थात तब्बल १,१५३ इतकी आहे. तर धडगावला अवघ्या ३१ जणांची तपासणी झाली आहे.जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने गेल्या आठवड्यात दीड शतक गाठले आहे. तब्बल १६३ जण कोरोनाबाधीत झाले असून त्यातील ७० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६ जणांनी आपला जीव गमावला आहे. सर्वाधिक बाधीत रुग्ण हे नंदुरबार तालुक्यात आहेत. तालुक्यातील सर्वाधिक लोकांना क्वॉरंटाईन करण्याचीही वेळ आलेली आहे. प्रशासनातर्फे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असले तरी संख्या कमी होत नसल्याची स्थिती आहे.जिल्ह्यातील पहिला आणिसर्वाधिक रुग्णही नंदुरबारातचजिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण नंदुरबारात आढळला व सर्वाधिक रुग्णही नंदुरबार तालुक्यातच आहेत. आजच्या स्थितीत तालुक्यात ६६ रुग्ण आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यात ११० रुग्ण आढळून आले. त्यातील ४६ रुग्ण बरे झाले असून ३ जणांनी आपला जीव गमावला आहे. एकुण १,१९४ जणांची कोवीड तपासणी करण्यात आली आहे. सद्य स्थितीत संस्थात्मक विलगीकरणात तब्ल १२५ जण आहेत. नंदुरबार शहरातील चारही बाजुंच्या कॉलनीसह दुधाळे, रनाळे, रजाळे, सैताणे, नटावद या गावांना रुग्ण आढळून आलेले आहेत.शहादा : तीन मृत्यूजिल्ह्यात कोरोनामुळे एकुण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात नंदुरबार शहरातील तीन तर शहादा तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. तालुक्यात नंदुरबार खालोखाल सर्वाधिक २० रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात पहिला रुग्ण शहादा शहरातील होता. आढळलेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाल्याने भितीचे वातावरण पसरले होते. परंतु शहादा शहरवासीयांनी कोरोनाला बऱ्यापैकी अटकाव आणण्यात यश मिळविले. सद्य स्थितीत तालुक्यातील केवळ ६ रुग्णच जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत तर १४ रुग्ण बरे झाले आहेत.एकुण ३२५ जणांची कोवीड तपासणी तालुक्यात करण्यात आली असून सध्या ४२ जण संस्थात्मक क्वॉरंटाईन आहेत. शहादा शहरासह बामखेडा, हिंगणी, लोणखेडा, मंदाणा, तोरखेडा येथे रुग्ण आढळून आले आहेत.तळोदा : अचानक संख्या वाढलीजिल्ह्यात जूनच्या दुसºया आठवड्यापर्यंत तळोदा व धडगाव तालुके हे कोरोनामुक्त होते. परंतु बाहेर गावाहून आलेल्यांनी तळोद्यात कोरोनाचा शिरकाव करण्यास मदत केली. एकुण १८ रुग्ण तळोद्यात आढळून आले आहेत. अवघ्या दोन आठवड्यात तालुका कोरोना रुग्ण संख्येत जिल्ह्यात तिसºया स्थानावर आला आहे. सद्य स्थितीत तळोद्यातील १४ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर चार रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यातील १२८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. तर संस्थात्मक विलगीकरणात ४७ जण आहेत.दुर्गम भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आला. परंतु मोलगी येथे अखेर शिरकाव झालाच. तो देखील बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे. दुसरीकडे धडगाव तालुका अद्यापही कोरोनामुक्त आहे. तालुक्यातील जनतेने कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही. येत्या काळात देखील शिरकाव होऊ नये यासाठी तालुकावासी सज्ज आहेत. परंतु बाहेर गावाहून ये-जा करणाºया कर्मचाऱ्यांमुळे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबीवर प्रतिबंध घालावा आणि दुर्गम आदिवासी भागातील जनतेला कोरोनामुक्तच राहू द्यावे अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. मोलगीत जी संख्या वाढली आहे ती पोलीस कर्मचाºयांची आहे. मोलगी व परिसरातील सामान्य माणसाचा त्यात समावेश नाही. अक्कलकुवा येथील यापूर्वीचे चारही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.महामार्गावर असलेले आणि गुजरातच्या सिमेवर लागून असलेल्या नवापूर तालुक्यात देखील कोरोनाचा शिरकाव झाला नाही. केवळ विसरवाडी येथील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाली. त्याच्यापासून इतरांना होऊ नये म्हणून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी कोरोनाला अटकाव करता आला. दुसरीकडे नवापूर शहराला लागून असलेल्या गुजरातमधील गावातील काही रुग्ण आढळून आले. शहरवासीयांनी लागलीच उपाययोजना केल्या आणि कोरोनाला सिमेवरच रोखले. आजच्या स्थितीत धडगाव नंतर नवापूर तालुका कोरोनाला अटकाव करण्यात यशस्वी झाला आहे. तालुक्यातील ७० जणांची कोवीड तपासणी करण्यात आली आहे. सद्य स्थितीत तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नसल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. यापुढेही कोरोनामुक्त तालुका राखण्यासाठी तालुकावासीय प्रयत्नशील आहेत.