शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील विविध भागात मतदार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

नंदुरबार : तालुक्यातील ईसाईनगर येथील के.डी. गावीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. ...

नंदुरबार : तालुक्यातील ईसाईनगर येथील के.डी. गावीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी एस.व्ही. विसपुते यांनी विद्यार्थ्यांना मतदानाची महत्त्व सांगून शपथ दिली. प्रसंगी मुख्याध्यापक बी.डी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात प्रत्येकाने मतदान नोंदणी करावी व प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा. तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रचार व जनजागृती करावी, यामुळे लोकशाही मजबूत होईल, असे आवाहन व्ही.एस. पाटील, बी.जे. जावरे, एम. व्ही. वसावे यांनी केले. मुख्याध्यापक बी.डी. पाटील यांनी मतदार हा लोकशाहीचा कणा असून, यासाठी मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे सांगितले. यशस्वीतेसाठी एम.आर. वसावे, आर.पी. शाह, आर.एन. पाटील, ए.डी. खेडकर, ए.टी. नाईक, प्रा.जयाप्रती वसावे, सी.डी. जाधव, एम.डी. पेटकर, आर.एस. पाडवी उपस्थित होते.

तळोदा

तळोदा शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान, महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय मतदार दिन तहसीलदार गिरीश वखारे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ.एस.आर. मगरे, नायब तहसीलदार बबनराव अहिरराव, नायब तहसीलदार रामजी राठोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. जे.एन. शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व पटवून सांगितले. तहसीलदार गिरीश वखारे यांनी लोकशाहीत निवडणुकांचे महत्त्व व मतदारांचेे योगदान यासंदर्भात मार्गदर्शन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पंकज सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. हेमंत चौधरी यांनी आभार मानले.