शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी ‘सुसाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचे दर कमी झाल्याने मध्यप्रदेशातील बाजार थंडावला आहे़ या पार्श्वभूमीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचे दर कमी झाल्याने मध्यप्रदेशातील बाजार थंडावला आहे़ या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाणारा कापूस येथील सीसीआयच्या केंद्रांमध्येच विक्री होत आहे़ यातून सीसीआयची गाडी सुसाट सुटली असून जिल्ह्यातील दोन्ही केंद्र मिळून १ लाख ३० हजार क्विंटल कापूस आवक पूर्ण झाली आहे़नंदुरबार तालुक्यातील पळाशी आणि शहादा येथे कापूस खरेदी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे़ कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया अर्थात सीसीआयकडून याठिकाणी कापूस खरेदी करण्यात येते़ गेल्या वर्षी शहादा बाजारात सीसीआयला केवळ २० हजार क्विंटल कापूस खरेदी करता आला होता़ हीच स्थिती नंदुरबार येथेही होती़ वारंवार खरेदी बंद पडल्यानंतर सीसीआयला २५ हजार क्विंटलपर्यंत मजल मारता आली होती़ यंदाही सीसीआयने प्रारंभी ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांना परत पाठवल्यामुळे सीसीआयच्या केंद्रांबाबत रोष प्रकट करत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती़ यातून केंद्र जानेवारीमध्येच आवरते घेतील अशी स्थिती निर्माण झाली होती़ परंतू गेल्या दोन महिन्यात बदलेले वातावरण उशिराने लागवड केलेल्या कापूस उत्पादनाच्या पथ्यावर पडले आहे़ बोंड फूटून बाहेर पडणाºया कापसाला उन्हाने साथ दिल्याने कापसाच्या ओलाव्याचा प्रश्न निकाली निघाल्याने सीसीआयकडे कापूस विक्री करण्यास शेतकºयांनी प्राधान्य दिले होते़ यातून नंदुरबार आणि शहादा या दोन्ही केंद्रांमध्ये भरघोस कापूस आवक होऊन केंद्रांची उलाढालही वाढली आहे़ यात विशेष बाब म्हणजे कापूस खरेदी करणाºया व्यापाºयांनी माघार घेतल्याने सीसीआयला लाभ झाला आहे़ आगामी १५ दिवस खरेदीचा हा वेग कायम राहणार असल्याने यंदाच्या वर्षात उलाढालीचे आकडे हे चढेच राहणार आहेत़शहादा बाजार समितीच्या अखत्यारितील सिसीआयच्या केंद्रात आतापर्यंत ८० हजार ७०० क्विंटल कापूस खरेदी पूर्ण करण्यात आली आहे़ शहादा येथील सीसीआयच्या केंद्राने पाच वर्षांपूर्वी २ क्विंटल कापूस खरेदी करुन नवीन विक्रम स्थापित केला होता़ हा विक्रम यंदाही अबाधित राहणार आहे़ १ लाख क्विंटलचा टप्पा येत्या चार दिवसात गाठला जाण्याची शक्यता आहे़ यातून बाजार समितीत अखेरपर्यंत किमान सव्वा लाख क्विंटल कापूस खरेदी होण्याची चिन्हे आहेत़ येथील बाजारात ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दर आहे़ यातून शेतकरी येथे दर दिवशी कापूस विक्रीसाठी आणत असल्याने आवक दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे़नंदुरबार बाजार समितीच्या पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात आतापर्यंत ३७ हजार क्विंटल कापूस आवक झाली आहे़ याठिकाणी केवळ सीसीआय ५ हजार ३५० ते ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करत आहेत़ या दरांना शेतकºयांनीही प्रतिसाद दिला असल्याने येथेही सध्या तेजीचा हंगाम आहे़शहादा तालुक्यालगत असलेल्या मध्यप्रदेशातील खेतिया ही कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे़ याठिकाणी यंदा कापूस दे पाच हजाराच्या पुढे गेलेले नाहीत़ यातून नंदुरबार जिल्ह्यातील दर हे ५ हजार ४५० पर्यंत असल्याने शेतकरी येथे कापूस विक्रीला प्राधान्य देत आहे़ राष्ट्रीय बाजारपेठेतील कापूस आणि सरकीच्या दरांवरुन खेतिया येथील कापसाचे दर ठरवण्यात येतात़ यामुळे येथे यंदा दर कमीच असल्याची माहिती देण्यात आली आहे़ खेतिया परिसरातील जिनिंगमध्येही यंदा काहीशी उदासिन स्थिती आहे़