जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी ‘सुसाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:08 PM2020-01-16T13:08:44+5:302020-01-16T13:08:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचे दर कमी झाल्याने मध्यप्रदेशातील बाजार थंडावला आहे़ या पार्श्वभूमीवर ...

CCI buys cotton in district | जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी ‘सुसाट’

जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी ‘सुसाट’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचे दर कमी झाल्याने मध्यप्रदेशातील बाजार थंडावला आहे़ या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाणारा कापूस येथील सीसीआयच्या केंद्रांमध्येच विक्री होत आहे़ यातून सीसीआयची गाडी सुसाट सुटली असून जिल्ह्यातील दोन्ही केंद्र मिळून १ लाख ३० हजार क्विंटल कापूस आवक पूर्ण झाली आहे़
नंदुरबार तालुक्यातील पळाशी आणि शहादा येथे कापूस खरेदी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे़ कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया अर्थात सीसीआयकडून याठिकाणी कापूस खरेदी करण्यात येते़ गेल्या वर्षी शहादा बाजारात सीसीआयला केवळ २० हजार क्विंटल कापूस खरेदी करता आला होता़ हीच स्थिती नंदुरबार येथेही होती़ वारंवार खरेदी बंद पडल्यानंतर सीसीआयला २५ हजार क्विंटलपर्यंत मजल मारता आली होती़ यंदाही सीसीआयने प्रारंभी ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांना परत पाठवल्यामुळे सीसीआयच्या केंद्रांबाबत रोष प्रकट करत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती़ यातून केंद्र जानेवारीमध्येच आवरते घेतील अशी स्थिती निर्माण झाली होती़ परंतू गेल्या दोन महिन्यात बदलेले वातावरण उशिराने लागवड केलेल्या कापूस उत्पादनाच्या पथ्यावर पडले आहे़ बोंड फूटून बाहेर पडणाºया कापसाला उन्हाने साथ दिल्याने कापसाच्या ओलाव्याचा प्रश्न निकाली निघाल्याने सीसीआयकडे कापूस विक्री करण्यास शेतकºयांनी प्राधान्य दिले होते़ यातून नंदुरबार आणि शहादा या दोन्ही केंद्रांमध्ये भरघोस कापूस आवक होऊन केंद्रांची उलाढालही वाढली आहे़ यात विशेष बाब म्हणजे कापूस खरेदी करणाºया व्यापाºयांनी माघार घेतल्याने सीसीआयला लाभ झाला आहे़ आगामी १५ दिवस खरेदीचा हा वेग कायम राहणार असल्याने यंदाच्या वर्षात उलाढालीचे आकडे हे चढेच राहणार आहेत़

शहादा बाजार समितीच्या अखत्यारितील सिसीआयच्या केंद्रात आतापर्यंत ८० हजार ७०० क्विंटल कापूस खरेदी पूर्ण करण्यात आली आहे़ शहादा येथील सीसीआयच्या केंद्राने पाच वर्षांपूर्वी २ क्विंटल कापूस खरेदी करुन नवीन विक्रम स्थापित केला होता़ हा विक्रम यंदाही अबाधित राहणार आहे़ १ लाख क्विंटलचा टप्पा येत्या चार दिवसात गाठला जाण्याची शक्यता आहे़ यातून बाजार समितीत अखेरपर्यंत किमान सव्वा लाख क्विंटल कापूस खरेदी होण्याची चिन्हे आहेत़ येथील बाजारात ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दर आहे़ यातून शेतकरी येथे दर दिवशी कापूस विक्रीसाठी आणत असल्याने आवक दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे़

नंदुरबार बाजार समितीच्या पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात आतापर्यंत ३७ हजार क्विंटल कापूस आवक झाली आहे़ याठिकाणी केवळ सीसीआय ५ हजार ३५० ते ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करत आहेत़ या दरांना शेतकºयांनीही प्रतिसाद दिला असल्याने येथेही सध्या तेजीचा हंगाम आहे़
शहादा तालुक्यालगत असलेल्या मध्यप्रदेशातील खेतिया ही कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे़ याठिकाणी यंदा कापूस दे पाच हजाराच्या पुढे गेलेले नाहीत़ यातून नंदुरबार जिल्ह्यातील दर हे ५ हजार ४५० पर्यंत असल्याने शेतकरी येथे कापूस विक्रीला प्राधान्य देत आहे़ राष्ट्रीय बाजारपेठेतील कापूस आणि सरकीच्या दरांवरुन खेतिया येथील कापसाचे दर ठरवण्यात येतात़ यामुळे येथे यंदा दर कमीच असल्याची माहिती देण्यात आली आहे़ खेतिया परिसरातील जिनिंगमध्येही यंदा काहीशी उदासिन स्थिती आहे़

Web Title: CCI buys cotton in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.