कानुमातेला पावसासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:28 IST2019-07-09T12:28:46+5:302019-07-09T12:28:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथे कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. ...

Carumatela monsoon for rain | कानुमातेला पावसासाठी साकडे

कानुमातेला पावसासाठी साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथे कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रजाळे येथील परशराम पाटील यांच्या घरी परंपरेनुसार कानुबाई मातेचा उत्सव श्रावण महिन्यात साजरा करण्यात येत होता. मात्र काही वर्षापासून त्यांच्या घरी कानुमातेचा उत्सव खंडीत झाला होता. शनिवारी कानुबाई मातेला वाजत-गाजत मिरवणूक काढून उत्साहाने स्थापन करण्यात आले. रात्री भाविकांनी अहिराणी व मराठी भाषेतील गीत गाऊन जागरण केले. घरात सुख-शांती नांदावी म्हणून पारंपरिक पध्दतीने उत्सव साजरा केला. रविवारी गावातून मिरवणूक काढून कानुमातेला निरोप दिला. या वेळी भाविकांनी पावसासाठी मातेकडे साकडे घातले.
 

Web Title: Carumatela monsoon for rain