कंज्यापाणी येथे ज्वारीत लावला गांजा, साडेचार लाखाचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST2021-09-16T04:38:32+5:302021-09-16T04:38:32+5:30

शिलदार फाड्या पावरा मु. कंज्यापाणी पोस्ट काकडदा ता. धडगाव असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने कंजापानी गावाचे ...

Cannabis planted in Kanjyapani, 4.5 lakh cannabis seized | कंज्यापाणी येथे ज्वारीत लावला गांजा, साडेचार लाखाचा गांजा जप्त

कंज्यापाणी येथे ज्वारीत लावला गांजा, साडेचार लाखाचा गांजा जप्त

शिलदार फाड्या पावरा मु. कंज्यापाणी पोस्ट काकडदा ता. धडगाव असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने कंजापानी गावाचे शिवारातील ज्वारी पीक असलेल्या शेतामध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या गांजा रोपांची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळाली होती. एलसीबी व धडगाव पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत गांजाची झाडे जप्त करण्यात आली. ६४ किलो वजनाची आणि चार लाख ५३ हजार ३२० रुपयांची झाडे पोलीसांनी जप्त केले आहे. शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करणेची कारवाई सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार अनिल गोसावी, दीपक गोरे, रवींद्र पाडवी, जितेंद्र अहिरराव यांच्या पथकासह धडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ औताडे, हवालदार राजेंद्र जाधव, विनोद पाटील, राजेश्वर भुसलवाड यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Cannabis planted in Kanjyapani, 4.5 lakh cannabis seized