शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

शहादा सीसीआय केंद्रात तीन दिवसात २५ हजार क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा बाजार समितींतर्गत सीसीआयच्या केंद्रात तीन दिवसात २९० वाहनांमधून तब्बल २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा बाजार समितींतर्गत सीसीआयच्या केंद्रात तीन दिवसात २९० वाहनांमधून तब्बल २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणला आहे़ हा कापूस मोजून ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने सीसीआयचे केंद्र शुक्रवारपासून पुन्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे़सोमवारी हे केंद्र सुरुळीतपणे सुरु करुन कापूस खरेदीलाही सुरुवात करण्यात आली होती़ परंतू रविवार ते बुधवार या तीन दिवसात तब्बल २९० चवाहने दाखल झाली़ सोमवारी तब्बल १३ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली होती़ तर मंगळवारी आणि बुधवारी वाहनांमधील कापूस मोजणी सुरु होती़ या वाहनातून किमान १३ हजार क्विंटल कापूस आवक होणार असल्याने त्याची मोजणी करुन तयार गाठी तयार करण्यासाठी तेवढ्या क्षमतेच्या जिनिंग उपलब्ध नसल्याने अडचणी वाढणार आहेत़ यातून सीसीआयने बाजार समितीला पत्र देत पुढील सूचना मिळेपर्यंत खरेदी बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत़शहादा केंद्राने दीड लाख क्विंटलाचा टप्पा पार पाडला आहे़ येथे दररोज कापूस आवक वाढतच असल्याने कापूस साठा करण्याची समस्या उद्भवत आहे़ येत्या काळात केंद्र नेमके कधी सुरु होणार याची ठोस माहिती मात्र मिळू शकलेली नाही़दरम्यान नंदुरबार केंद्रात मात्र कापूस खरेदी सुरळीत राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ नंदुरबार केंद्राने बुधवारी ६५ हजार क्विंटल कापूस खरेदीचा टप्पा पार केला आहे़ केंद्राला गोडावून मिळाल्याने त्यांची खरेदीची क्षमता वाढली आहे़ शेतकऱ्यांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी केवळ शनिवार आणि रविवार हे केंद्र बंद राहणार आहे़