शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

बस सुरु झाली मात्र रस्त्यामुळे हाल सोसवेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टीमुळे आठ पुल वाहून गेल्याने मोलगी ते अक्कलकुवा वाहतूक तब्बल दोन महिने बंद होती़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीवृष्टीमुळे आठ पुल वाहून गेल्याने मोलगी ते अक्कलकुवा वाहतूक तब्बल दोन महिने बंद होती़ कालांतराने भराव करुन वाहतूक सुरु झाली असली तरी पूर्वीपेक्षा रस्ता अधिक खराब झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांवर भराव करुन तसेच रस्त्यावर मुरुम टाकून आमलीबारी ते डाब असा देवगोई घाटातील रस्ता वाहतूकीसाठी खुला केला होता़ गेल्या आठवडय़ात यामार्गाने अक्कलकुवा ते मोलगी अशी बसवाहतूकही सुरु झाली आह़े परंतू पावसाळ्यापेक्षा आता रस्त्याची अधिक दयनीय स्थिती असल्याने बसमध्ये प्रवास करणा:यांना हाल सोसवत नसल्याचे चित्र आह़े या मार्गासाठी राज्याशासनाने 69 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करुन दिला आह़े यासाठी परराज्यातील ठेकेदारास काम करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आह़े गेल्यावर्षी मंजूर झालेला निधी यंदाच्या वर्षात खर्च करण्याची गरज होती़ परंतू वर्ष उलटूनही 31 किलोमीटर अंतरात एक साधा दगडही जागचा हलवला गेलेला नसल्याचे चित्र आह़े मार्गात जागोजागी खडी उखडून रस्त्याखाली असलेल्या शिळा वर येत असल्याने वाहनांना अपघातांचा धोका आह़े यंदा पावसाळ्यात वाहून गेलेल्या पुलांचे बांधकाम येत्या चार महिन्यात सुरु होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने 2020 मध्ये येणा:या पावसाळ्यात पुन्हा संपूर्ण चार महिने वाहतूक बंद होण्याची शक्यता असल्याचे बांधकाम विभागाच्या कामकाजावरुन दिसून येत आह़े