बस सुरु झाली मात्र रस्त्यामुळे हाल सोसवेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:03 IST2019-11-18T13:02:57+5:302019-11-18T13:03:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टीमुळे आठ पुल वाहून गेल्याने मोलगी ते अक्कलकुवा वाहतूक तब्बल दोन महिने बंद होती़ ...

बस सुरु झाली मात्र रस्त्यामुळे हाल सोसवेनात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अतीवृष्टीमुळे आठ पुल वाहून गेल्याने मोलगी ते अक्कलकुवा वाहतूक तब्बल दोन महिने बंद होती़ कालांतराने भराव करुन वाहतूक सुरु झाली असली तरी पूर्वीपेक्षा रस्ता अधिक खराब झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत़
सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांवर भराव करुन तसेच रस्त्यावर मुरुम टाकून आमलीबारी ते डाब असा देवगोई घाटातील रस्ता वाहतूकीसाठी खुला केला होता़ गेल्या आठवडय़ात यामार्गाने अक्कलकुवा ते मोलगी अशी बसवाहतूकही सुरु झाली आह़े परंतू पावसाळ्यापेक्षा आता रस्त्याची अधिक दयनीय स्थिती असल्याने बसमध्ये प्रवास करणा:यांना हाल सोसवत नसल्याचे चित्र आह़े या मार्गासाठी राज्याशासनाने 69 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करुन दिला आह़े यासाठी परराज्यातील ठेकेदारास काम करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आह़े गेल्यावर्षी मंजूर झालेला निधी यंदाच्या वर्षात खर्च करण्याची गरज होती़ परंतू वर्ष उलटूनही 31 किलोमीटर अंतरात एक साधा दगडही जागचा हलवला गेलेला नसल्याचे चित्र आह़े मार्गात जागोजागी खडी उखडून रस्त्याखाली असलेल्या शिळा वर येत असल्याने वाहनांना अपघातांचा धोका आह़े यंदा पावसाळ्यात वाहून गेलेल्या पुलांचे बांधकाम येत्या चार महिन्यात सुरु होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने 2020 मध्ये येणा:या पावसाळ्यात पुन्हा संपूर्ण चार महिने वाहतूक बंद होण्याची शक्यता असल्याचे बांधकाम विभागाच्या कामकाजावरुन दिसून येत आह़े