कोंडाईबारी घाटात बसचा अपघात, सात जण जखमी
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 16, 2023 14:42 IST2023-04-16T14:42:02+5:302023-04-16T14:42:27+5:30
बस व दोन ट्रक यामध्ये धडक झाल्याने अपघात

कोंडाईबारी घाटात बसचा अपघात, सात जण जखमी
मनोज शेलार, नंदुरबार: धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात रविवारी सकाळी धुळे-सुरत बसचा भीषण अपघात झाला. बस व दोन ट्रक यामध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. यात सात प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात दोन बालकांचा समावेश आहे.
जखमींमध्ये आस्था हेमंत जडे (१४), पूजा अशोक सोनार (२४) रा. धुळे, भीमराव खंडेराव मोरे (८८) रा. दोंडाईचा, दिपाली किसन जगताप, (३२), डॅनिश किसन जगताप (६वर्ष) रा. सुरत, बसचालक पोपट सोनू सरग (४८) व वाहक अमृत सुभाष पाटील (३५) रा. साक्री यांचा समावेश आहे.
साक्री आगाराची एस.टी.बस धुळ्याहून सुरतकडे जात होती. सकाळी १० वाजता बस कोंडाईबारी घाटात आली असता उतारावर ओव्हरटेक करीत असतांना ट्रक व कंटेनरमध्ये बस घुसली. त्यामुळे बसचा समोरील व डावीकडील भाग चेपला गेला. बसमध्ये ४२ प्रवासी होते. त्यातील सातजण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व विसरवाडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे विसरवाडी व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विसरवाडी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.