नंदुरबारात घरफोडी, सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 26, 2023 19:03 IST2023-04-26T19:03:01+5:302023-04-26T19:03:15+5:30
दोन लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.

नंदुरबारात घरफोडी, सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास
नंदुरबार : घरात घुसूृन युवकाने दीड लाखाचे दागिने व ७३ हजार रूपये रोख असा दोन लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबारातील जुनी सिंधी कॉलनी परिसरात गीता सचानंद गंगवाणी यांचे घर आहे. पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास विशाल ऊर्फ बुट्टा तलरेजा याने स्वयंपाक घराच्या मागील दरवाजाला धक्का मारून उघडत आत प्रवेश केला.
घरातील कपाटात ठेवलेले दीड लाख रुपयांचे सोने व चांदीचे दागिने, ७३ हजार रूपये रोख आणि मोबाइल असा एकूण एक लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पहाटे पावणेचार वाजता ही घटना घडली. याबाबत गीता सचानंद गंगवाणी यांनी फिर्याद दिल्याने विशाल ऊर्फ बुट्टा विजयकुमार तलरेजा (१९) रा. सिंधी कॉलनी, नंदुरबार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रवीण कोळी करीत आहे. संशयीताला लागलीच पोलिसांनी अटक केली.