सराफा व्यावसायिकांचा जिल्हाभरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:44+5:302021-08-24T04:34:44+5:30

नंदुरबारात संपूर्ण सराफा बाजार बंद होता. त्यामुळे नेहमीच गजबजलेल्या या भागात शांतता होती. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनोज श्रॉफ, कार्यकारी अध्यक्ष ...

Bullion traders closed in the district | सराफा व्यावसायिकांचा जिल्हाभरात कडकडीत बंद

सराफा व्यावसायिकांचा जिल्हाभरात कडकडीत बंद

नंदुरबारात संपूर्ण सराफा बाजार बंद होता. त्यामुळे नेहमीच गजबजलेल्या या भागात शांतता होती. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनोज श्रॉफ, कार्यकारी अध्यक्ष सुनील सोनार, उपाध्यक्ष जगदीश सोनी, सचिव संजय जैन, पांडुरंग सराफ, जितेंद्र सोनार, राजेश सोनार, मयूर सोनार, हार्दीक श्रॉफ, जितेंद्र सोनार, हिरालाल सोनी आदींच्या सह्या आहेत.

शहादा येथे देखील कडकडीत बंद पाळण्यात आला. तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अल्पेश सराफ, राम जाधव, पंकज सोनार, सोमेश्वर सोनार, सोनार निलेश सोनार दिनेश जैन गौरव जोशी अभिषेक सोनार, अमित सोनार, सुमित सोनार, प्रितेश सोनार यांसह शहादा शहरातील सुवर्णकार सराफ व्यावसायिक उपस्थित होते.

नवापूर येथे देखील कडकडीत बंद होता. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर नवापूर सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक सोनार, नगरसेवक महेंद्र दुसाने, विलास थोरात, संदीप पारेख, प्रणव सोनार, राजेंद्र वानखेडे, महेल पारेख, अल्पेश पारेख, अनिल सोनार, सौरव भामरे, कुणाल भामरे, अक्षय सोनार, शाम सोनार, निर्मल थोरात, ईश्वर दुसाने यांच्यासह सुवर्णकार असोसिएशन दुकानदारांच्या सह्या आहेत.

Web Title: Bullion traders closed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.