शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

Breaking News: नंदुरबार जिल्ह्यात 1 एप्रिलपासून पुर्णत: संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 09:14 IST

Corona Virus in Nandurbar: जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे आदेश जारी केले आहेत. नागरिकांकडे पुढील पाच दिवस अत्यावश्यक कामे करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नंदुरबार : एकीकडे राज्यात उद्या मध्यरात्रीपासून रात्रीच्या वेळी जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले असताना नंदुरबार जिल्ह्यात 1 एप्रिलपासून पुर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Complete curfew in Nandurbar district from April 1.)

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे आदेश जारी केले आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात 31 मार्च रोजी मध्यरात्रीपासून ते 15 एप्रिल 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत  पुर्णत: संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थारपन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.नागरिकांकडे पुढील पाच दिवस अत्यावश्यक कामे करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सोलापूरमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व दुकाने आज व उद्या बंद राहणार; वाढत्या कोरोनामुळे घेतला प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 

राज्यात काय परिस्थिती....

गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात ३६ हजार ९०२ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १७ हजार ०१९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. तर ११२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यात आतापर्यंत २६ लाख ३७ हजार ७३५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २३ लाख ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ८२ हजार ४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८७.२ टक्के इतका आहे. 

मुंबईत पुन्हा ५ हजारांपेक्षा अधिक रुग्णशुक्रवारी पुन्हा एकदा मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. शुक्रवारी मुंबईत ५ हजार ५१३ कोरोनाबाधित सापडले. तर १ हजार ६५८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. सध्या मुंबईत ३७ हजार ८०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी होऊन ६८ दिवसांवर आला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडू देण्यात आली.

रात्रीची जमावबंदीराज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी ( २८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या