नाश्ता लॅारीच्या वादातून एकाचे डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 21:24 IST2021-01-10T21:24:50+5:302021-01-10T21:24:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नाश्ताची लॅारी लावण्याच्या वादातून दोघांनी एकाच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून जखमी केल्याची घटना नंदुरबारातील ...

नाश्ता लॅारीच्या वादातून एकाचे डोके फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नाश्ताची लॅारी लावण्याच्या वादातून दोघांनी एकाच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून जखमी केल्याची घटना नंदुरबारातील होळ शिवारातील ॲाईल मिल कंपाऊंड जवळ घडली.
नंदुरबारातील होळ शिवारात ऑईल मिल आहे. या परिसरात अनिल जाधव यांनी नाश्ताची लॅारी लावली होती. ती लावण्यावरून मोसम उर्फ मोहित सुरेश मराठे व जाधव यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. अनिल जाधव व सुदाम जाधव यांनी लोखंडी पाईपने मराठे यांच्या डोक्यावर मारून जबर दुखापत केली. तसेच शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत अनिल व सुदाम जाधव यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक पाटील करीत आहे.