सहा महामार्ग देतील जिल्ह्याला ‘बुस्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 13:11 IST2020-01-01T13:10:58+5:302020-01-01T13:11:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नव्या वर्षात जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले सात महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतूकीसाठी सज्ज होण्याची शक्यता ...

सहा महामार्ग देतील जिल्ह्याला ‘बुस्टर’
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नव्या वर्षात जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले सात महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतूकीसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे़ यातील तीन मार्गांची रखडलेली कामे नव्या वर्षात सुरु होणार असून उर्वरित तीन मार्गांसाठी शासनाकडून निधी मिळण्याची शक्यता आहे़
राज्याच्या एका टोकाला असलेला नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो़ रेल्वे मार्गामुळे देशपटलावर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून काही वर्षांपूर्वी केवळ सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हाच जात होता़ कालांतराने शासनाकडून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी पाच राष्ट्रीय महामार्गांची घोषणा करण्यात आली़ तूर्तास यातील तीन महामार्गाची कामे मंजूर आहेत़ काही महिन्यांपासून बंद असलेल्या महामार्ग चौपदरीकरण आणि विस्तारीकरणास सुरुवात होणार आहे़
जिल्हा विकासात मोलाचे योगदान नवापुर तालुक्यातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाने दिले आहे़ तब्बल ५३ किलोमीटर अंतर जिल्ह्यातून असलेल्या या मार्गाचे चौपदरीकरण नव्याने सुरु होणार आहे़ यासाठी रस्ते व जहाजबांधणी मंत्रालयाने निधी व नवीन ठेकेदार यांची नियुक्ती केल्याची माहिती असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यंदाच्या वर्षात तशी घोषणा करुन कामाला सुरुवात करणार आहे़
यंदाच्या वर्षात शेवाळीफाटा ते गुजरातमधील नेत्रंग तसेच विसरवाडी ते सेंधवा या महामार्गांचे रखडलेले काम पुन्हा वेगात सुरु होणार आहे़ सोबत प्रस्तावित असलेल्या सोलापूर-धडगाव आणि धरणगाव ते धानोरा अर्थात गुजरातहद्दर्पयतचा राज्यमार्गांचे विस्तारीकरणही नव्याने सुरु होणार आहे़ विसरवाडी ते सेंधवा हा महामार्ग विसरवाडी येथून नागपूर-सुरत महामागार्पासून निघालेला आहे़ सेंधवा येथे मुंबई-आग्रा महामागार्ला हा महामार्ग जोडला जाणारी याची लांबी १७० किलोमीटर आहे़ नंदुरबार जिल्ह्यात या महामार्गाची लांबी ही ११० किलोमीटर आहे़ विसरवाडी ते कोळदा व कोळदा ते खेतिया अशा दोन टप्प्यात दोन वर्षापासून कामाला वेग आला आहे़
विसरवाडी ते सेंधवा महामार्गामुळे तापी व गोमाई नदीवर अनुक्रमे प्रकाशा आणि लोणखेडा येथे तर नेंत्रग ते शेवाळी महामार्गावर हातोडा येथे नवीन पुलाची उभारणी सुरु होऊन कामही पूर्ण होणार आहे़
या महामार्गांमुळे नंदुरबार शहर राष्ट्रीय पटलावर येणार आहे़ या रस्त्यावर नंदुरबारच्या रिंग रोाड प्रस्तावीत आहे़ खामगाव ते वाघोदा शिवार व पातोंडा यामार्गाने तो मंजूर होऊ शकतो़