‘सातपुड्या’चे बॉयलर अग्निप्रदीपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:31 IST2020-10-11T12:31:40+5:302020-10-11T12:31:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या ४६ वा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ कारखाना सार्ईटवर चेअरमन ...

‘सातपुड्या’चे बॉयलर अग्निप्रदीपन
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या ४६ वा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ कारखाना सार्ईटवर चेअरमन दीपक पाटील व जिल्हा परिषद सभापती जयश्री पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. सातपुडा साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांनी १८ हजार ४१३ एकर उसाची नोंदणी केली असून कारखान्याच्या गाळप हंगामात पाच लाख ५० हजार मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती दीपक पाटील यांनी दिली.
अध्यक्षस्थानी कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील होत्या. कार्यक्रमास खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील, रवींद्र राऊळ, सूतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, नगरसेवक नाना निकम, माजी नगरसेवक के.डी. पाटील, विजय दामू पाटील, एकनाथ नाईक, संजय चौधरी, माधवी पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक उपस्थित होते.
या वेळी दीपक पाटील म्हणाले की, अडचणी भरपूर असल्या तरी कारखाना सुस्थितीत सुरु राहणार आहे. कारखाना शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यालाच ऊस दिला पाहिजे. रिकाम्या लोकांच्या नादी न लागता कारखान्यासोबत रहावे. कारखान्याबाबत वेडेवाकडे बोलणाºयांचे ऐकून घेऊ नका. कारखाना मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. अडचणीतून मार्ग काढीत कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. कर्मचाºयांनी परिश्रम घेत कारखान्याची घोडदौड सुरु ठेवली आहे. जगासोबत चालायचे असेल तर कारखान्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारीत यंत्रांचा वापर करावा लागणार आहे.आम्ही कधीही शेतकºयांना अडविले नाही. परंतु काही लोकं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पारदर्शक कारभाराचे धडे आम्हाला स्व.पी.के. अण्णांनी दिले असून त्याच पद्धतीने सर्व कारभार सुरु आहे. सातपुडा कारखाना हा शेतकºयांचा आहे. इतर कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा हक्काच्या सातपुडा कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्तविकात कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील म्हणाले की, शाश्वत पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जात असून १९ हजार एकर ऊसाची लागवड झाली आहे. साडेपाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट कोसळले तरी कामगारांना वेळेवर वेतन देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. गळीत हंगामाची परवानगी शासनाने दिली असून महिनाअखेर हंगाम सुरु करण्याचा कारखान्याचा प्रयत्न राहील. विना थांबता हंगाम पार पाडण्यासाठी कामगारांनी प्रयत्न करावे. पुढील गाळप हंगाम १६० दिवस चालेल. कारखाना सुस्थितीत असून पूर्ण क्षमतेने सुरु राहणार आहे यात शंका बाळगू नये. गळीत हंगाम चांगला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारखान्याने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा कारखाना जास्तीचे गाळप करेल यासाठी कारखान्याचे सर्वच अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार प्रवीण पाटील यांनी मानले.