शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर शहराजवळ महामार्गावर कारमध्ये आढळून आला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

पोलिस सूत्रांनुसार, गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास टेलिफोन ऑफिससमोर एक कार (क्रमांक जी.जे.०५ टीसी ००१७) महामार्गावर मध्यभागी उभी ...

पोलिस सूत्रांनुसार, गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास टेलिफोन ऑफिससमोर एक कार (क्रमांक जी.जे.०५ टीसी ००१७) महामार्गावर मध्यभागी उभी दिसून आली. त्याठिकाणी कारमध्ये कोणीही नव्हते. प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ नवापूर पोलिसांना फोन करून बोलवले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता मागच्या सीटवर प्लॅस्टीक टेपच्या सहाय्याने तोंड बांधून संपूर्ण शरीरावर व हातापायावर गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेला एकाचा मृतदेह दिसून आला. नवापूर पोलिसांनी कारच्या क्रमांकाची खात्री केली असता काहीही निष्पन्न झाले नाही. कारच्या पासिंगवरून सदर इसम हा सुरत भागातील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. निर्घृण हत्या करून मृतदेह नवापूर शहरानजीक कारमध्ये आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृतदेह नेमका कोणाचा? कोणी खून केला? नवापूर शहरात कार का सोडून गेले? हत्याकांडामध्ये नवापूरचा काही संबंध आहे का? याबाबत पोलीस तपास करीत आहे. घटनास्थळी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस निरीक्षक धीरज महाजन व पोलीस कर्मचार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. कारची तपासणी केली असता काही कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यावरून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला आहे. ही कार महामार्गावरून क्रेनच्या सहाय्याने पोलीस ठाण्याकडे नेण्यात आली आहे.