सोनवलच्या व्यक्तीचा तापी पात्रात मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:38 IST2019-07-07T12:38:05+5:302019-07-07T12:38:53+5:30

सोनवलच्या व्यक्तीचा तापी पात्रात मृतदेह  लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : तापी पात्रात सोनवल, ता.शहादा येथील व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने ...

Body of Sonawal's body in TAPI | सोनवलच्या व्यक्तीचा तापी पात्रात मृतदेह

सोनवलच्या व्यक्तीचा तापी पात्रात मृतदेह

सोनवलच्या व्यक्तीचा तापी पात्रात मृतदेह 
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : तापी पात्रात सोनवल, ता.शहादा येथील व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीवर मानोपचाराचे उपचार सुरू असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. 
गोविंद वेडू पाटील (38) रा.सोनवल, ता.शहादा असे मयत व्यक्तीचे नाव आहे. प्रकाशा येथील तापी पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यांची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी व ग्रामस्थांनी या व्यक्तीचा फोटो सोशल मिडियावर टाकला. एका ग्रृपवर सोनवलचे पोलीस पाटील गोरख मोरे यांना त्यांचा फोटो दिसला. त्यांनी तो ओळखला असता खात्री करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. प्रकाशा येथे येवून नातेवाईकांनी खात्री केली असता मृतदेह गोविंद वेडू पाटील यांचा असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तपास गौतम बोराले करीत आहे. 
 

Web Title: Body of Sonawal's body in TAPI