आरोग्य तपासणीसाठी बोटीने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:35 IST2021-01-11T12:35:08+5:302021-01-11T12:35:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या व नर्मदा काठावरील भूषा गावाजवळ असलेल्या भादल व पानमोळी ...

आरोग्य तपासणीसाठी बोटीने प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या व नर्मदा काठावरील भूषा गावाजवळ असलेल्या भादल व पानमोळी येथे आरोग्य कर्मचाऱ्यांनी बोटीने जाऊन तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करत कुष्ठरोगाची माहिती दिली.
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात नर्मदा काठावरील भूषा गावाजवळ असलेले भादल व पानमोळी या दुर्गम गावांना जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे आरोग्यसेवा देण्यासाठी अडचणी निर्माण होतात. झापी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यासाठी बोटीने आरोग्य कर्मचारी गावात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. भादल, पानमोळी, झापी येथे कुष्ठरोगासह आरोग्याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी कुष्ठरोग पर्यवेक्षक वसंत राठोड, आरोग्यसेवक रमेश ब्राह्मणे, मदतनीस गुलाब पावरा, जितन्या पावरा, मास्तर पावरा, आशा सेविका जेमाली गुलाबसिंग पावरा, बोका हुताया पावरा, नायजा पावरा आदींनी परिश्रम घेतले.