तळोदा महाविद्यालयात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:47+5:302021-01-13T05:21:47+5:30
कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून शासनाच्या आवाहनाचे पालन करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. पल्लवी शर्मा व ...

तळोदा महाविद्यालयात रक्तदान शिबिर
कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून शासनाच्या आवाहनाचे पालन करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. पल्लवी शर्मा व योगेश वसावे या विद्यार्थ्यांनी रक्तदान करून शिबिरास सुरुवात केली. शिबिरात २९ दात्यांनी रक्तदान केले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .आर. मगरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. एस. आर. गोसावी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा विभागाचे शहादा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. एस. बी. गरुड, प्रा. डॉ. एस. एन. शर्मा, नंदूरबार जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी तथा तळोदा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, डॉ. लोखंडे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पराग तट्टे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पंकज सोनवणे यांनी मानले. शिबिराचे आयोजन प्रा. डॉ. सुनीता गायकवाड यांनी केले. प्रा. डॉ. जी. एम. मोरे, प्रा. डॉ. पी. आर. बोबडे, प्रा. कमलेश बेडसे, प्रा. आर. डी. मोरे, प्रा. डॉ. चव्हाण, प्रा. यशोद आदींनी सहकार्य केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हिरालाल पावरा, गुलाबसिंग वळवी, महेंद्र पाडवी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.